एक्स्प्लोर

करिष्मा कपूर आणि संदीप तोष्णीवाल यांचं ब्रेकअप?

करिष्माला पुन्हा लग्नबंधनात अडकण्यात रस नसल्याने lतिने संदीपसोबतचं नातं तोडल्याची माहिती आहे.

मुंबई : अभिनेत्री करिष्मा कपूर आणि बिझनेसमन संदीप तोष्णीवाल डेटिंग करत असल्याच्या चर्चा बॉलिवूडमध्ये होत्या. इतकंच काय, दोघं जण विवाहबंधनात अडकणार असल्याचंही म्हटलं जात होतं. मात्र आता करिष्मा आणि संदीपच्या नात्यात फूट पडल्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. करिष्मा आणि संदीप यांनी आपल्या रिलेशनशीपची जाहीर कबुली कधीच दिली नव्हती. मात्र पार्ट्यांपासून परदेशवारीपर्यंत अनेक ठिकाणी दोघं एकत्र दिसल्याने त्यांच्याबद्दल कुजबूज होत असे. मे महिन्यात करिष्मा-संदीपने आपल्या नात्याला पूर्णविराम दिल्याचं म्हटलं जातं. करिष्माला पुन्हा लग्नबंधनात अडकण्यात रस नसल्याने त्यांनी नातं तोडल्याची माहिती आहे. करिष्माला समायरा आणि किआन या दोघा मुलांच्या पालनपोषणाकडे लक्ष द्यायचं आहे. करिष्माला पुन्हा विवाहबंधनात अडकण्यात इंटरेस्ट नसल्याचं करिष्माचे वडील आणि दिग्गज अभिनेते रणधीर कपूर जून महिन्यात म्हणाले होते. 'करिष्माने पुन्हा लग्न करावं, अशी आमची इच्छा आहे, पण तिला पुन्हा संसार सुरु करायचा नाही. तिला मुलांकडे लक्ष द्यायचं आहे' असं रणधीर कपूर म्हणाले होते. करिष्माने 29 सप्टेंबर 2003 रोजी बिझनेसमन संजय कपूरशी लग्न केलं होतं. ते संजयचं दुसरं लग्न होतं. 11 वर्षांच्या संसारानंतर 2014 मध्ये दोघांनी काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला. 2016 मध्ये त्यांना घटस्फोट मिळाला. घटस्फोटानंतर मुलांचा ताबा करिष्माकडे आला. संजय आणि त्याच्या आईने आपला मानसिक छळ केल्याचा आरोप करिष्माने केला होता, तर करिष्माने पैशांसाठी लग्न केल्याचा दावा संजयने केला होता. त्यानंतर, संजय कपूरने प्रिया सचदेवशी तिसरं लग्न केलं. प्रिया सचदेव ही प्रसिद्ध हॉटेल मालक विक्रम चटवालची पत्नी होती. दुसरीकडे, संदीप तोष्णीवालने 2010 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. संदीप आणि त्याची डॉक्टर पत्नी अश्रिता या दोघांमध्ये सात वर्ष घटस्फोटासाठी लढाई सुरु होती.

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Embed widget