एक्स्प्लोर

तर सैफ-करिनाच्या चिमुकल्याचं नाव 'तैमूर'ऐवजी 'हे' असतं...

तैमूरचं नाव 'फैज' ठेवण्याकडे सैफ अली खानचा कल होता, अशी आठवण अभिनेत्री करिना कपूरने सांगितली.

मुंबई : करिना कपूर आणि सैफ अली खान यांचा छोटा नवाब 'तैमूर' या ना त्या कारणाने सातत्याने चर्चेत असतो. कधी त्याचे फोटो, तर कधी त्याच्यावरुन होणारे विनोद. आता करिनाने तैमूरच्या नावाशी निगडीत एक आठवण सांगितली. तैमूरचं नाव 'फैज' ठेवण्याकडे सैफचा कल होता, असं करिनाने सांगितलं. 'तैमूरच्या नावावरुन वादंग माजल्यानंतर सैफ घाबरला होता. तैमूरच्या जन्मावेळी मी हॉस्पिटलमध्येच होते. तैमूर नावामुळे खूप वाद होत असल्याचं सैफने मला सांगितलं. आम्हाला ट्रोल केलं जात असल्याचंही सैफ म्हणाला. सैफला तैमूरचं नाव बदलून फैज ठेवायचं होतं. फैज हे नाव जास्त रोमँटिक आणि काव्यात्मक असल्याचं सैफ म्हणाला होता.' असं करिना सांगते. 'मी सैफला ठाम नकार दिला. मी ठरवलं होतं, जर मुलगा झाला, तर तो लढवय्या असेल. तैमूर म्हणजे लोह. मी एका लोहपुरुषाला जन्म देणार. तैमूर नावाचा मला अभिमान आहे.' अशा शब्दात करिनाने आठवणींना उजाळा दिला. लोकांसाठी नाही, तर त्याला शाळेत कोणी चिडवू नये, म्हणून मला त्याचं नाव बदलायचं होतं, असं सैफचं म्हणणं होतं. तैमूरभोवती कायमच फोटोग्राफर्सचा गराडा पडलेला असतो. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी उसळते. एकीकडे लोक तो सतत लाईमलाईटमध्ये असल्याने नावं ठेवतात, मात्र त्याचे फोटो पाहण्यासाठी उड्याही मारतात. करिना कपूरने मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात 20 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 7.30 वाजता तैमूरला जन्म दिला. 'तैमूर'चं नाव जाहीर केल्यानंतर टीकेची राळ उठली होती. तुर्की क्रूरकर्माच्या नावावरुन हे नामकरण झाल्याचं म्हटलं जात होतं. 'माझ्या बाळाचं नाव तुर्की राज्यकर्त्यावरुन ठेवण्यात आलेलं नाही. मला त्या राजाविषयी पूर्ण माहिती आहे. त्याचं नाव तिमूर होतं, माझ्या मुलाचं नाव तैमूर आहे. कदाचित नावाचा उगम एकच असेल, पण नाव सारखं नाही.' असं सैफ अली तैमूरच्या जन्माच्या महिन्याभरानंतर म्हणाला होता. तैमूरचा अर्थ काय? तैमूर हे पर्शियन भाषेतील अत्यंत जुनं नाव असल्याचं सैफ अली खानने सांगितलं होतं. तैमूरचा अर्थ लोह किंवा लोखंड. मला आणि करिनाला या शब्दाचा उच्चार आणि अर्थ भावला. आम्ही काढलेल्या असंख्य नावांपैकी तिला हेच सगळ्यात जास्त आवडलं. या नावाला वजन आहे, असं सैफने सांगितलं होतं. माझ्या एका लांबच्या भावाचं नाव तैमूर आहे. मी त्याच्यासोबत लहानाचा मोठा झालो. माझ्या मोठ्या मुलीचं, म्हणजे साराचं नावही आमच्या कुटुंबातील एका व्यक्तीच्या नावावरुन ठेवलं होतं, अशी आठवणही सैफने सांगितली होती.

संबंधित बातम्या :

काँग्रॅट्स अंकल, सैफच्या पहिल्या लग्नात करिनाच्या शुभेच्छा

तैमूर अली खान पतौडी, सैफीनाच्या मुलाच्या नावाची चर्चा का?

गर्भ लिंग परीक्षणाच्या आरोपांबाबत सैफ अली खान म्हणतो…

सैफ अली खानची मुलगी आणि सुशीलकुमार शिंदेंचा नातू

‘मी प्रेग्नंट आहे, मेली नाही’, करीना भडकली

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss OTT Anurag Dobhal: मी पुन्हा चालू शकेन की...'; बिग बॉस फेम प्रसिद्ध यूट्यूबरची प्रकृती गंभीर, इन्स्टा LIVE करताना झाला होता अपघात
'मी पुन्हा चालू शकेन की...'; बिग बॉस फेम प्रसिद्ध यूट्यूबरची प्रकृती गंभीर, इन्स्टा LIVE करताना झाला होता अपघात
Dhurandhar 2 VS Project Hail Mary: 2 तास 36 मिनिटांच्या 'या' फिल्मनं 'धुरंधर 2'ला लोळवलं; तीनच दिवसांत 1300 कोटींहून अधिक कलेक्शन
2 तास 36 मिनिटांच्या 'या' फिल्मनं 'धुरंधर 2'ला लोळवलं; तीनच दिवसांत 1300 कोटींहून अधिक कलेक्शन
Bigg Boss OTT Arman Malik: बिग बॉस फेम यूट्यूबर पाचव्यांदा झाला बाबा; पहिल्या पत्नीनं दिला चौथ्या बाळाला जन्म, दुसरी पत्नीही गरोदर
बिग बॉस फेम यूट्यूबर पाचव्यांदा झाला बाबा; पहिल्या पत्नीनं दिला चौथ्या बाळाला जन्म, दुसरी पत्नीही गरोदर
Fardeen Khan Spotted With Mystery Woman: 'ही माझी बायको नाही रे...', इव्हेंटमध्ये मिस्ट्री वुमनसोबत स्पॉट झाला प्रसिद्ध अभिनेता; सर्वांसमोर म्हणाला असं काही की... VIDEO
'ही माझी बायको नाही रे...', इव्हेंटमध्ये मिस्ट्री वुमनसोबत स्पॉट झाला प्रसिद्ध अभिनेता; सर्वांसमोर म्हणाला असं काही की... VIDEO

व्हिडीओ

Gopichand Padalkar : खरातने जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ घातली,सनसनाटी आरोप
Ashok Kharat | खरातच्या दरबारात कुणाकुणाची हजेरी? Special Report
Eknath Shinde Speech Uddhav Thackeray |दीर्घायुष्य लाभो, प्रगती होवो, निरोपाच्या भाषणात भरभरुन बोलले
Bachchu Kadu On Ashok Kharat :खरातसोबत माझी भेट एक्सीडेंटल, व्हायरल व्हिडीओवर कडू स्पष्टच म्हणाले..
Devendra Fadnavis speech on Ashok Kharat: महिलांच्या योनीत बोट, लघवी पाजली, सभागृहात A टू Z सांगितलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'गेल्या तीन वर्षांत जगात सर्वाधिक घसरण इराणी रियाल, लेबनीज पाउंड आणि भारतीय रुपयाची झाली, इराण आणि लेबनॉनवर बॉम्ब पडत आहेत, पण आपल्या देशावर कोणते बॉम्ब पडत आहेत?'
'गेल्या तीन वर्षांत जगात सर्वाधिक घसरण इराणी रियाल, लेबनीज पाउंड आणि भारतीय रुपयाची झाली, इराण आणि लेबनॉनवर बॉम्ब पडत आहेत, पण आपल्या देशावर कोणते बॉम्ब पडत आहेत?'
कोल्हापुरात पिण्याचा पाण्याचा शिमगा संपत नसताना आता गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेलमुळे जीव सपशेल टांगणीला; पहाटेपासूनच अनेक पेट्रोल पंपावर रांगा, जिल्हा प्रशासनाच्या कागदी घोड्यांनी काहीच अंदाज येईना
कोल्हापुरात पिण्याचा पाण्याचा शिमगा संपत नसताना आता गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेलमुळे जीव सपशेल टांगणीला; पहाटेपासूनच अनेक पेट्रोल पंपावर रांगा, जिल्हा प्रशासनाच्या कागदी घोड्यांनी काहीच अंदाज येईना
Gold Rate : सोन्याच्या दरात 30000 रुपयांची घसरण झाल्यानंतर 5 हजार रुपयांची वाढ, चांदी 20 हजारांनी वाढले, सोनं किती रुपयांवर पोहोचणार?
Gold Rate : सोनं 5 हजार रुपयांनी महागलं,... तर सोन्याचे दर 1 लाख 70 हजारांवर पोहोचणार, सोने व्यावसायिक काय म्हणाले?
Pune Metro tunnel: वाड्यासाठी बोअरवेल खोदली, थेट मेट्रोच्या बोगद्याला खड्डा पडला; शिवाजीनगर ते स्वारगेट जाणाऱ्या भूमिगत मेट्रोमार्गिकेवरील हादरवणारा प्रकार, काय घडलं?
वाड्यासाठी बोअरवेल खोदली, थेट मेट्रोच्या बोगद्याला खड्डा पडला; शिवाजीनगर ते स्वारगेट जाणाऱ्या भूमिगत मेट्रोमार्गिकेवरील हादरवणारा प्रकार, काय घडलं?
Stock Market : मार्केट सुरु होताच गुंतवणूकदारांची 400000 कोटींची कमाई, बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजीचा ट्रेंड
मार्केट सुरु होताच गुंतवणूकदारांची 400000 कोटींची कमाई, बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजीचा ट्रेंड
Gold Rate : सोने चांदीच्या दरामध्ये अनपेक्षित ट्रेंड, सोने आणि चांदीच्या दरातील घसणीला ब्रेक,चांदी 12000 हजारांनी महागली, सोनं किती रुपयांवर?
सोने आणि चांदीच्या दरातील घसणीला ब्रेक,चांदी 12000 हजारांनी महागली, सोनं किती रुपयांवर?
Karnataka Policy Regarding Digital Usage: कर्नाटकात लहान मुलांसाठी स्क्रीन टाईम ठरला, 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मसुदा प्रसिद्ध; दोन तास नेट सुद्धा बंद राहणार!
कर्नाटकात लहान मुलांसाठी स्क्रीन टाईम ठरला, 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मसुदा प्रसिद्ध; दोन तास नेट सुद्धा बंद राहणार!
Ashok Kharat Snake: सरकारी वकिलांनी कोर्टात 20 फुटांच्या नागाचा उल्लेख करताच अशोक खरात गांगरला, एकटक बोटाकडे पाहत राहिला अन्....
सरकारी वकिलांनी कोर्टात 20 फुटांच्या नागाचा उल्लेख करताच अशोक खरात गांगरला, एकटक बोटाकडे पाहत राहिला अन्....
Embed widget