एक्स्प्लोर
सोनम-रणबीरचं लग्न व्हावं ही करिना-करिष्माची इच्छा?
मुंबई : कपूर खानदानाचा चिराग 'रणबीर कपूर' सध्या सिंगल असला तरी त्याचं सूत कोणासोबत जुळणार याची उत्सुकता चाहत्यांसह तमाम बॉलिवूडकरांना लागली आहे. रणबीरच्या चुलत बहिणी अर्थात प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर आणि करिष्मा कपूर यांना मात्र अभिनेत्री सोनम कपूर आणि रणबीरचं लग्न व्हावं, अशी इच्छा व्यक्त केल्याची माहिती आहे.
रणबीरची आई, प्रख्यात अभिनेत्री नितू सिंग यांनी कतरिनाच्या नावे नाक मुरडल्याचं म्हटलं जायचं. फॅमिली फंक्शनमधून कतरिनाला चार हात लांब ठेवणाऱ्या नितू यांच्या मनात सूनबाईच्या रुपात दीपिका पदुकोणच बसल्याची चर्चाही रंगली होती. मात्र रणबीर दोघींपासून वेगळा झाला. त्यातच आता बहिणींनीही रणबीरच्या मागे लग्नाचा धोशा लावलेला दिसत आहे.
कॉफी विथ करणच्या सेटवर करिना आणि सोनम एकाच सोफ्यावर बसल्या होत्या. त्यावेळी बोलताना करिनाने 'सोनमला वहिनी म्हणून बघायला आवडेल' अशी हळूच पुडी सोडली. सोनम आणि रणबीर यांनी संजय लीला भन्साळी यांच्या 'सावरिया' चित्रपटातून एकत्र बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यावेळी त्यांचं अफेअर असल्याच्याही चर्चा होत्या. मात्र नंतर दोघे एकत्र दिसले नाहीत.
करिनाने इच्छा व्यक्त करताच, होस्ट करण जोहरनेही सोनमला बोलतं केलं. 'मी आणि रणबीर चांगले मित्र होऊ शकतो. पण मी त्याला खुश ठेवू शकेन असं वाटत नाही' असं म्हणत सोनमने सगळ्यांचीच बोलती बंद केली. 'कॉफी..'च्या तिसऱ्या सिझनमध्ये सोनमने रणबीरची त्यावेळची गर्लफ्रेण्ड दीपिकाविषयी तिखट कमेंट केली होती. त्यामुळे रणबीर काहीसा नाराज होता, मात्र काही काळांनी दोघांनी हा विषय बाजुला ठेवला. आता ते संजय दत्तच्या बायोपिकमध्येही एकत्र झळकणार आहेत. करिना-करिष्माचं बोलणं बाकीचे कितपत मनावर घेणार, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.
दुसरीकडे आनंद अहुजा आणि सोनम कपूर एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याची चर्चा आहे. सोनम आणि आनंद 2017 मध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती आहे. दोघं गेलं वर्षभर डेटिंग करत असून अनेक पार्ट्यांनाही त्यांनी एकत्र हजेरी लावली आहे. 'आनंद्ज अॅपरल्स' ब्रँडचे कपडे सोनम परिधान करताना आणि त्याचं प्रमोशन करताना वारंवार दिसते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement