Kareena Kapoor Troll : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) सध्या चर्चेत आहे. नुकतच मुंबईत एका कार्यक्रमात अभिनेत्रीने हजेरी लावली होती. तिच्या लाल रंगाच्या ड्रेसमुळे ती ट्रोल झालीच पण आता तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राष्ट्रगीताला चुकीच्या पद्धतीने उभी राहिल्याने बॉलिवूडची बेबो ट्रोल झाली आहे. 


करीनाच्या व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे? (Kareena Kapoor Video Viral)


करीना कपूरने मुंबईतील एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी दीप प्रज्वलन केल्यानंतर अभिनेत्रीने उपस्थित सर्व मंडळींसोबत राष्ट्रगीत गायलं. राष्ट्रगीतादरम्यान अभिनेत्री हातात हात ठेऊन उभी होती. राष्ट्रगीतादरम्यान सावधानमध्ये उभी न राहिल्याने बेबोला प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे. राष्ट्रीगीतादरम्यान सावधानमध्ये उभं राहायचं असतं हे कृपया तिला सांगा, इथेही अभिनय करते का? सावधान राहायचं असतं, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 






करीनाचा हटके लूक (Kareena Kapoor New Look)


करीनाचा हटके लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. मात्र नेटकऱ्यांनी मात्र तिला चांगलच ट्रोल केलं आहे. आपल्या सुपरहॉट लूकने अभिनेत्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. करीनाने लाल रंगाचा आऊटफिट परिधान केला होता. करीनाचा हटके लूक पाहून बेबो म्हणून की लाल मिरची असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. करीनाच्या नव्या लूकवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. पण या लूकमध्ये अभिनेत्री खूपच आनंदी दिसत आहे. ढगळा कूर्ता आणि लुंगी स्टाइल कुर्ता अभिनेत्रीने परिधान केला होता. 


करीनाचे आगामी प्रोजेक्ट (Kareena Kapoor Upcoming Project)


करीना कपूर सध्या तिच्या आगामी 'जाने जान' (Jane Jaan) सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात करीना कपूरसह विजय वर्मा, जयदीप अहलावतदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. येत्या 21 सप्टेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक हा सिनेमा पाहू शकतात. तसेच ‘The Buckingham Murders’ आणि 'द क्रू' हे अभिनेत्रीचे आगामी सिनेमे आहेत. करीनाच्या आगामी प्रोजेक्टची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Kareena Kapoor : बेबो म्हणू की लाल मिरची? करीनाचा सुपरहॉट लूक पाहिलात का?