Jeh Birthday Party :  करीना कपूर ( Kareena Kapoor ) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांनी एका मोठ्या पार्टीचे आयोजन केले आहे. सैफिनाचा लाडका जेह (Jeh) याचा तिसरा वाढदिवस साजरा करण्यात आला. या बर्थ डे पार्टीत बर्थ डे बॉय जेहने सगळ्यांचे लक्ष वेधले. जेहच्या वाढदिवसाच्या पार्टीला या जोडप्याने चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनाही आमंत्रित केले होते. यामध्ये रणबीर कपूर, सोनम कपूरही आपल्या मुलांसोबत आले. जेहचा मोठा भाऊ तैमूर हा आपल्या शाळेतील मित्रांसोबत स्कूल युनिफॉर्ममध्येच बर्थ डे पार्टीला आला. 


जेहने त्याच्या बर्थ डे पार्टीत पांढरा शर्ट, काळी जीन्स आणि निळ्या रंगाचे जॅकेट परिधान केले. तर सैफने कुर्ता-पायजमा आणि करीना कपूरही ग्रीन ब्लेझरसह ब्लू जीन्समध्ये दिसली.






राहासोबत आला रणबीर 


या बर्थ डे पार्टीत जेहचा मामा रणबीर कपूर यानेही हजेरी लावली. रणबीरसोबत चिमुकली राहा देखील होती. सुरुवातीला रणबीरने आपली भाची समायरा साहनी (रिद्धिमा कपूरची मुलगी) सोबत आला. मात्र, काही वेळेतच त्याने रणबीरने राहाला कडेवर घेतले. 







तैमूर आला शाळेतील मित्रांसोबत


जेहचा मोठा भाऊ  तैमूरने या पार्टीत झोकात एन्ट्री घेतली. तैमूरने थेट शाळेतून या पार्टीत हजेरी लावली. यावेळी त्याच्यासोबत त्याचे शाळेतील मित्रदेखील होते. तैमूर आणि त्याचे मित्र हे स्कूल युनिफॉर्ममध्ये होते. त्यांनीदेखील लक्ष वेधून घेतले. 






सोनम कपूरही उपस्थित 


सोनम कपूरनेही जेहच्या बर्थ डे पार्टीत हजेरी लावली. यावेळी तिच्यासोबत तिचा मुलगा वायू होता. 






दरम्यान, जेहच्या बर्थ डे पार्टीत नेहा धुपिया, अमृता अरोरा, सोहा अली खान आणि कुणाल खेमू देखील त्यांच्या मुलांसोबत पार्टीत उपस्थित होते. याशिवाय करीना कपूरचे वडील रणधीर कपूर आणि आई बबिता कपूर देखील पार्टीबाहेर दिसले.