Kareena Kapoor Khan on Sanjay Leela Bhansali:  मिस वर्ल्डचा किताब मिळवलेली अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) हिच्या देवदास चित्रपटासाठी तिला विशेष पसंती मिळाली. या चित्रपटात तिने पारोची भूमिका साकारली होती. या सिनेमातील तिचं नृत्य, अभिनय या सगळ्याचसाठी प्रेक्षकांनी तिला अगदी डोक्यावर घेतलं. संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या तितकाच पसंतीस पडतो. पण या सिनेमासाठी सर्वात आधी करिनाची (Kareena Kapoor Khan) वर्णी लागली होती. त्यानंतर मात्र करिनाने संजय लीला भन्साळींसोबत (Sanjay Leela Bhansali) कधीही काम न करण्याचा निर्णय घेतला. 


पण फार कमी जणांना माहित आहे की, या सिनेमात ऐश्वर्याच्या जागी करिनाची वर्णी लागली होती. तिचं स्क्रिन टेस्टिंग झालं, सायनिंग अमाऊंट देखील देण्यात आली पण नंतर तिला या सिनेमातून काढून टाकण्यात आलं. पण यावर संजय लीला भन्साळी यांनी प्रतिक्रिया देत या आरोपांचं खंडन केलं


करिनाने का घेतला असा निर्णय?


ऐश्वर्याच्या जागी देवदास या सिनेमात सुरुवातीला करिना कपूर खान हीची वर्णी लागली होती. फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीमध्ये करिनाने याबाबत खुलासा केला आहे. त्यानंतर करिनाने आतापर्यंत संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात काम केलं नाही. यावर बोलताना तिने म्हटलं की, देवदास या सिनेमासाठी संजय लीला भन्साळी यांनी माझी स्क्रिन टेस्ट घेतली होती आणि मला साइनिंग अमाऊंटही दिली होती. पण नंतर अचानक मला चित्रपटातून काढून टाकण्यात आलं. त्यानंतर करिना बरीच दुखावली गेली. पुढे तिने म्हटलं की, तो माझ्या करिअरचा सुरुवातीचा टप्पा होता, म्हणून मी दुखावले गेले. संजयने मला दुखावलं आहे. त्यामुळे आता माझ्याकडे काम नसेल तरी मी त्याच्यासोबत काम करणार नाही.


संजय लीला भन्साळींची प्रतिक्रिया काय दिली?  


करिनाच्या या मुलाखतीनंतर संजय लीला भन्साळी यांची देखील प्रतिक्रिया समोर आली होती. त्यामध्ये त्यांनी करिनाच्या आरोपांचं खंडन केलं होतं. त्यावर त्यांनी म्हटलं की, करिना नीता लुलासोबत मला भेटायला आली होती आणि माझ्यासोबत काम करण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती. त्यानंतर तिचे फोटोशूट कॉश्च्युमसोबत झाले.पण तेव्हा तिला स्पष्ट करण्यात आलं होतं की, हे फोटोशूट ती सिनेमासाठी सिलेक्ट झाली याची पुष्टी करत नाही. या फोटोशूटनंतर त्यांनी तिला सांगितलं की पारोच्या भूमिकेसाठी ऐश्वर्याचं योग्य आहे. त्यावर तिने काहीही प्रतिक्रिया दिली नसल्याचं त्यांनी म्हटलं. पण पुढे ती उगाच भडकू लागल्याचं म्हणत संजय लीला भन्साळी यांनी या सगळ्यावर भाष्य केलं आहे. 


ही बातमी वाचा : 


Juna Furniture : आई-वडिलांना गृहित धरणाऱ्यांनी पाहावा असा 'जुनं फर्निचर'; महेश मांजरेकर म्हणतात...