Kareena Kapoor Khan Ignored Fan: आपल्या आवडत्या सेलिब्रिटीसोबत सेल्फी काढायची इच्छा अनेकांना असते. कलाकरांसोबत सेल्फी काढण्यासाठी चाहते अनेकदा गर्दी करतात. नुकतीच अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) ही एअरपोर्टवर स्पॉट झाली. यावेळी करीनासोबत सेल्फी काढायला एक चाहती तिच्या जवळ आली पण करीनानं तिच्या त्या फॅनला इग्नोर केलं. करीना आणि तिच्या या फॅनचा व्हिडीओ  एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी करीनाला ट्रोल केलं आहे. 


ग्रँड प्रिक्स स्पर्धेत सहभागी होण्यासाठी करीना ही मोनॅको येथे गेली होती. तिथून परतत असताना ती मुंबई विमानतळावर स्पॉट झाली.  करिना ही एअरपोर्टवर ऑल व्हाईट लूकमध्ये स्पॉट झाली. व्हाईट स्नीकर्स, ब्लॅक सनग्लासेस, व्हाईट हुडी ट्रॅकसूट असा लूक करीनानं केला होता.  नुकताच मुंबई विमानतळावरील करीनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, करीनाची फॅन सेल्फी काढण्यासाठी तिच्या जवळ आली, मात्र करिनाने तिच्या फॅनकडे पाहिलेही नाही आणि ती सरळ चालत राहिली, त्यानंतर तिच्या सुरक्षा रक्षकाने चाहत्याला हातवारे करून करीनापासून दूर राहण्यास सांगितले.


नेटकऱ्यांनी केलं ट्रोल


एअरपोर्टवरील या व्हायरल व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी करीनाला तिला ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'ती सगळ्या उद्धट सेलिब्रिटी आहे.' तर दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट केली,  'या लोकांना लोकांनी इतकं महत्त्व का दिलं? त्यापेक्षा तुमच्या पालकांसोबत तसेच मित्रांसोबत सेल्फी काढा'


पाहा व्हिडीओ:






करीनाचे चित्रपट


काही दिवसांपूर्वी करीनाचा लाल सिंह चढ्ढा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटात करीनासोबत आमिर खाननं काम केलं. . या चित्रपटाला प्रेक्षकांची फारशी पसंती मिळाली नाही. आता करीनाच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  तसेच करीना ही लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार आहे, असंही म्हटलं जात आहे. करीना ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते.  करीना ही सोशल मीडियावर अॅक्टिव असते. विविध पोस्ट ती सोशल मीडियावर शेअर करते. 


महत्वाच्या बातम्या :  


Taimur : 'बंद करा दादा'; फोटोग्राफर्सवर भडकला तैमूर, नेटकरी म्हणाले...