Taimur : अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) यांचा मुलगा तैमूर (Taimur) हा सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतो. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच तैमूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये तैमूर फोटोग्राफर्सवर भडकलेला दिसत आहे. 


करिना, जे आणि तैमूर यांना मुंबईमधील त्यांच्या घराबाहेर स्पॉट करण्यात आलं. यावेळी तेथे करिनाचे काही स्टाफ मेंबर्स देखील उपस्थित होते. काही फोटोग्राफर्स तैमूर, जे आणि करिनाचे फोटो काढत होते. त्यावेळी तैमूर फोटोग्राफर्सला म्हणतो, 'कॅमेरा बंद करो दादा, बंद करो दादा...' या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंंट्स केल्या आहेत.






नेटकऱ्यांनी व्हायरल व्हिडीओवर केल्या कमेंट्स
तैमूरच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओला नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. एका युझरनं या व्हिडीओला कमेंट केली, 'क्यूट' तर दुऱ्यानं कमेंट केली, 'मुलावर चांगले संस्कार केले आहेत.'एक नेटकरी म्हणाला,'ही कसली बोलायची पद्धत?' 


हेही वाचा :