Karan Kundra : अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejaswi Prakash) आणि करण कुंद्रा (Karan Kundra) छोट्या पडद्यावरील या लोकप्रिय जोडीच्या अनेक दिवसांपासून ब्रेकअपच्या चर्चा सुरु आहेत. अनेक कार्यक्रमांमध्ये या दोघांनी एकत्र हजेरी लावली होती. जेव्हापासून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु झाल्या, तेव्हापासून त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. पण नुकतच करणने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमुळे त्यांच्या चाहत्यांना एक सुखद धक्का बसला. 


मागील तीन वर्षांपासून करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश एकमेकांना डेट करत आहेत. पण त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु असूनही त्यावर अद्याप या दोघांपैकी कुणीही भाष्य केलेलं नाहीये. मात्र करणने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमुळे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. त्यांच्या या फोटोंवर अनेकांनी कमेंट करत त्यांना आयुष्यभर एकत्र राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 


करणची पोस्ट नेमकी काय?


करणने त्याच्या सोशल मीडियावर त्याचे आणि तेजस्वीचे काही फोटो शेअर केले आहेत. तसेच यावर त्याने गोड कॅप्शन देखील दिलंय. त्यांची ही रोमँटीक पोस्ट पाहून चाहते देखील चांगलेच खूष झालेत. त्यामुळे आता त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम लागला असून आता त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी लग्न कधी करणार असा प्रश्न देखील विचारला आहे. 






तेजस्वी आणि करणची लव्हस्टोरी (Tejasswi Prakash Karan Kundra Love Story)


सलमान खानच्या 'बिग बॉस 15'मध्ये (Bigg Boss 16) तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. बिग बॉसच्या प्रवासादरम्यान तेजस्वी आणि करणची मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. बिग बॉसनंतर तेजस्वी एकता कपूरच्या'नागिन 6' या मालिकेत झळकली. तर करणने छोट्या पडद्यावरील काही कार्यक्रम होस्ट केले. करण आणि तेजस्वी दोघेही सध्या कामात वयस्त आहेत.                                                 


ही बातमी वाचा : 


Manjiri Oak : 'मुलं आणि मस्कारा पण मोठी झाली,तू कधी होणार?' मंजिरी ओकची प्रसादसाठी पोस्ट; त्यावर अभिनेता म्हणाला,'मी किती “मोठ्ठा” झालोय'