Manjiri Oak : अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) हा दिग्दर्शक, अभिनेता म्हणून कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. प्रसाद हा जितका अभिनेता म्हणून उत्तम आहे, तितकाच तो उत्तम बाबा देखील आहे. प्रसादची बायको मंजिरी (Manjiri Oak) ही कायम बाबा म्हणून त्याच्यासाठी खास पोस्ट लिहित असते. सार्थक ओक आणि मयांक ओक ही प्रसादची दोन्ही मुलं आहेत. सार्थकने नुकतच परदेशातून त्याचं उच्च शिक्षण पूर्ण केलं असून मयांकला अभिनय क्षेत्रात येण्याची इच्छा असल्याचं प्रसादने त्याच्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. 


दरम्यान फादर्स डे निमित्ताने मंजिरीने प्रसादसाठी एक खास पोस्ट केली आहे. तिच्या या पोस्टवर प्रसादने देखील भन्नाट कमेंट केल्याचं पाहायला मिळालं आहे. तसेच अनेक कलाकारांनी देखील मंजिरीच्या या पोस्टवर कमेंट केलीये. यामध्ये मंजिरीने प्रसादचे त्याच्या मुलांसोबतचे काही फोटोही शेअर केलेत. 


मंजिरीची पोस्ट नेमकी काय?


मंजिरीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं की, “प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते” असं म्हणतात ना ??? (कित्ती टिपीकल वाक्य आहे ) पण एका यशस्वी आई च्या मागे एक “मधे मधे न येणारा” बाबा असतो.. तू “तो” बाबा आहेस प्रसाद…  2-3 वर्षातून एकदाच parents meeting ला जाऊन.. मुलांच्या complaints ऐकल्यानंतर.. तिथून येताना मुलांना कबुतरांना दाणे खायला घालणारा बाबा आहेस तू…  “बाबाला विचारून सांगते” असं माझ्या तोंडून ऐकल्यावर त्यावर भाबडे पणानी विश्वास ठेवणारा बाबा आहेस तू… अचानक “अभ्यासाविषयी चौकशी करणारा” आणि त्यावर “स्वतःच हसणारा” बाबा आहेस तू…


पुढे तिने म्हटलं की, घरात मंजू च boss आहे हे आपल्या आयुष्याच्या पहिल्या क्षणापासून accept करणारा बाबा आहेस तू…  अचानक कधीही मुलांना “ठीक आहेस ना” असं विचारणारा बाबा आहेस तू… मुलांच्या वेगवेगळ्या वयात तुझ्या “त्याच वयात” राहिलेला बाबा आहेस तू… लहानपणी मुलांना आणलेली खेळणी त्यांच्याशीच भांडून खेळणारा बाबा आहेस तू… आणि मोठे झाल्यावर त्यांचे नवे “shoes” त्यांना न सांगता हळूच घालून जाणारा बाबा आहेस तू… थोडक्यात काय , एका “गुणी आईच्या मुलांचा” बाबा आहेस तू… मुलं आणि मस्कारा पण मोठी झाली प्रसाद….तू कधी होणार???? पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांच्या डोळ्यात ज्याच्याविषयी अत्यंत आदर आणि प्रेम असणारा बाबा आहेस तू … अरे by the way HAPPY FATHERS DAY…!!!


मंजिरीच्या पोस्टवर प्रसादची कमेंट


मंजिरीच्या पोस्टवर प्रसादची कमेंट बरीच चर्चेत आलीये. त्यावर प्रसादने म्हटलं की, मंजू… माझ्याबद्दल चं “कौतुक” (?) ऐकून मन भरुन आलं… कित्ती छान छान आई आहेस गं तू… आणि by the way “happy Father’s Day” हे शेवटी लिहून सुध्दा पहिलं च वाचणारा बाबा आहे मी… हे लक्षात घे… आणि मस्कारा ला विचार मी किती “मोठ्ठा” झालोय ते. by the way माझ्या चार ही मुलांना खूप खूप प्रेम…!!!


ही बातमी वाचा : 


Prathamesh Parab : 'आजही ते सायकलवरुनच कामाला जातात', अभिनेता प्रथमेश परबची वडिलांसाठी स्पेशल पोस्ट