Janhvi Kapoor Shikhar Pahariya Pics: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. जान्हवी ही  शिखर पहाडियाला (Shikhar Pahariya) डेट करत आहे, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे.  करण जोहरने त्याच्या 'कॉफी विथ करण' या टॉक शोचा नुकताच एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला. यामध्ये जान्हवी कपूर ही तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना दिसत आहे.  या प्रोमोमध्ये जान्हवी  शिखरचं नाव घेताना दिसत आहे. आता, जान्हवीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती  शिखर, बोनी कपूर, खुशी कपूर आणि वेदांग रैना यांच्यासोबत स्पॉट झाली आहे.


जान्हवी आणि शिखर एकत्र झाले स्पॉट


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये जान्हवी कपूर आणि खुशी एका बिल्डिंगमधून कॅज्युअल लूकमध्ये बाहेर पडताना दिसत आहेत. त्यांच्यानंतर शिखर आणि वेदांगही त्याच बाहेर बिल्डिंगमधून येतात.


कॉफी विथ करणमध्ये जान्हवीनं शिखरचं घेतलं नाव


'कॉफी विथ करण' या टॉक शोच्या प्रोमोमध्ये दिसले की, करण जोहर  जान्हवीला करण विचारतो, 'तुझ्या फोनच्या स्पीड डायल लिस्टमध्ये 3 टॉप कॉन्टॅक्ट कोणाचे आहेत?' या प्रश्नाचं उत्तर देताना जान्हवी म्हणते, पप्पा, खुशू आणि शिखू (शिखर पहाडिया). जान्हवीनं शोमध्ये शिखरचं नाव घेतल्यानंतर आता या दोघांच्या डेटिंगची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.


शिखर आहे माजी मुख्यमंत्र्यांचा नातू


शिखर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. शिखर हा स्मृती शिंदे आणि संजय पहाडिया यांचा मुलगा आहे.  गेल्या काही दिवसांपासून जान्हवी आणि शिखर यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर चर्चा होत असते. जान्हवी कपूरनं शिखर पहाडियासोबतच्या नात्याची  अधिकृत घोषणा केलेली नाही. पण जान्हवी आणि शिखर यांना अनेकदा लंच आणि डिनर डेटनंतर स्पॉट करण्यात आलं.


पाहा व्हिडीओ:






 


जान्हवी ही राजकुमार रावसोबत 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटात काम करणार आहे. तसेच तिचा  देवरा हा चित्रपट देखील लवकरच रिलीज होणार आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Koffee With Karan 8: जान्हवी कपूरनं माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाचं नाव का घेतलं? करणच्या शोमध्ये काय-काय बोलली जान्हवी?