Karan Johar's 50th Birthday : बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि स्क्रिनरायटर असणाऱ्या करण जोहरचा (Karan Johar) आज 50 वा वाढदिवस आहे. करणचा जन्म 25 मे 1972 रोजी झाला. करण हा चित्रपट निर्माते यश जोहर आणि हीरु जोहर यांचा मुलगा आहे. करण हा अभिनेता व्हावा, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. करणनं त्याचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1989 मधील श्रीकांत या मालिकेमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. बालपणी करणचं वजन जास्त होतं. त्यामुळे त्याचे वडील यश जोहर हे त्याला वजन कमी करायचा सल्ला देत होते. पण नंतर करणनं अभिनय नाही तर दिग्दर्शनामध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला.  


करणनं  'दिलवाले दुल्हिनयां ले जाएंगे' या चित्रपटामधून बॉलिवूडमधील करिअरला सुरूवात केली. या चित्रपटाचा तो असिस्टंट डायरेक्टर होता. त्यानंतर करणनं  'कुछ कुछ होता है'  चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला सात फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते.  'कभी खुशी कभी गम,' 'कभी अलविदा न कहना,' 'माइ नेम इज खान,' स्टूडेंट ऑफ द इयर,' 'ऐ दिल है मुश्किल' आणि 'लस्ट स्टोरीज' या हिट चित्रपटांची निर्मिती करणनं केली. 


रिपोर्टनुसार, करण हा 1400 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. एका चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी तो तीन कोटी रुपये मानधन घेतो. करणकडे लग्झरी गाड्यांचे देखील कलेक्शन आहे. त्याच्याकडे  मर्सडीज आणि एस 560, बीएमडब्ल्यू यासारख्या लग्झरी गाड्या आहेत. करणला शूजचे कलेक्शन करायला देखील आवडते. त्याच्याकडे Louis, Vuitton, Stella, Mccartney, Donatella, Versace या कंपन्यांच्या शूजचे कलेक्शन आहे.


करण जोहरचा जुग जुग जियो हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. जुग जुग जियो या चित्रपटामध्ये कियारा आडवाणी आणि वरुण धवन हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. कौटुंबिक नात्यावर भाष्य करणारा हा सिनेमा विनोदी असणार आहे, ट्रेलरवरून याचा अंदाज येतो. 


संबंधित बातम्या


Tu Tevha Tashi : स्वप्नीलचं चाहत्यांना सरप्राईज, जीवलगानंतर आता 'तू तेव्हा तशी' मालिकेत दिसणार


Maha Episodes : राया कृष्णाला पुन्हा विधातेंच्या घरात आणणार, तर सौरभच्या वाड्यात रामनवमी साजरी होणार!