एक्स्प्लोर

Rishab Shetty: रश्मिकासोबत काम करणार का? ऋषभ शेट्टी म्हणाला, 'मला ती...'

एका मुलाखतीमध्ये ऋषभला काही अभिनेत्रींबाबात प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ऋषभनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले. 

Kantara:   'कांतारा' (Kantara)   या चित्रपटाचं दिग्दर्शन ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) यानं केलं असून त्याने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. कांतारामुळे ऋषभला विशेष लोकप्रियता मिळाली. ऋषभच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. ऋषभ कोणत्या अभिनेत्रीसोबत आगामी चित्रपटात काम करणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. एका मुलाखतीमध्ये ऋषभला काही अभिनेत्रींबाबात प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ऋषभनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले. 

सामंथा रुथ प्रभु, रश्मिका मंदाना, कीर्ती सुरेश आणि साई पल्लवी या अभिनेत्रींसोबत काम करायला तुला आवडेल का? असा प्रश्न एका मुलाखतीमध्ये ऋषभला विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना ऋषभ म्हणाला, 'मी स्क्रिप्टवर पूर्ण काम केल्यानंतर चित्रपटातील कलाकारांची निवड करतो.  मला असे कलाकार आवडत नाहीत.'

कोणत्याही अभिनेत्रीचं नाव न घेता पुढे ऋषभ म्हणाला, 'मला ती आवडत नाही. मला साई पल्लवी आणि समंथासोबत काम करायला आवडेल.' ऋषभ शेट्टीच्या या उत्तरानं सोशल मीडियावर अशी चर्चा होत आहे की, ऋषभनं रश्मिकासोबत काम करण्यास नकार दिला.

ऋषभनं पुढे मुलाखतीमध्ये कांताराच्या शूटिंगमधील एक किस्सा सांगितला. तो म्हणाला, 'कांताराचा क्लायमॅक्स सीन खूप कठीण होता. शूटिंगदरम्यान माझे दोन्ही खांदे डिस्लोकेट झाले. तरीही मी शूटिंग करत होतो.'

‘कांतारा’ हा चित्रपट 14 ऑक्टोबर रोजी हिंदीमध्येही प्रदर्शित झाला आहे. रिलीज होताच या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. 'कांतारा'मध्ये अच्युता कुमार, सप्तमी गौडा, प्रमोद शेट्टी आणि किशोर सहाय्यक भूमिकेत दिसले आहेत. 'कांतारा' हा चित्रपट एक अॅक्शन थ्रिलर आहे. 

कांतारा या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननं केवळ 8 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 17 कोटींहून अधिक कमाई केली आहे.  तर जगभरात या चित्रपटानं 170 कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखन करणाऱ्या ऋषभनं या चित्रपटात शिवा ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील  ऋषभच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. या चित्रपटासाठी  ऋषभनं चार कोटी मानधन घेतलं. 

एका मुलाखतीमध्ये ऋषभ शेट्टीनं कांताराला मिळालेल्या यशाबद्दल आपले मत मांडले होते. तो म्हणाला की, 'हे सर्व यश मिळवण्यासाठी 18 वर्षे मेहनत केली आहे आणि हे एका रात्रीत घडलेले नाही.  मी फक्त बॉक्स ऑफिस कलेक्शनसाठी काम केलेले नाही. मल्याळम, तेलगू आणि इतर देशांतील सर्व भाषांमधील प्रेक्षकांचा मी आभारी आहे.'

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Kantara: कांतारा फेम ऋषभ शेट्टी 'या' चित्रपटात करणार नाही काम? अभिनेत्याला केलं जाऊ शकतं रिप्लेस

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff Car Attack: पहिली गोळी काचेवर लागताच टायगर श्रॉफला धोक्याची जाणीव, लगेच खाली वाकला; पण दुसरी गोळी थेट ड्रायव्हर फिरदौसला लागली, VIDEO
पहिली गोळी काचेवर लागताच टायगर श्रॉफला धोक्याची जाणीव, लगेच खाली वाकला; पण दुसरी गोळी थेट ड्रायव्हर फिरदौसला लागली...
Rajnikant Jailer 2: रजनीकांतचा जलवा! 'जेलर 2'नं सोमवारीही सिनेमागृहात धुरळा उडवला, मोडले बरेच रेकॉर्ड्स, 5 व्या दिवशी किती कमावले?
रजनीकांतचा जलवा! 'जेलर 2'नं सोमवारीही सिनेमागृहात धुरळा उडवला, मोडले बरेच रेकॉर्ड्स, 5 व्या दिवशी किती कमावले?
Tiger Shroff Shooting: फक्त 35 हजारासाठी टायगर श्रॉफवर फायरिंग? पोलीस तपासात काय काय आढळलं? हादरवणारी माहिती समोर
फक्त 35 हजारासाठी टायगर श्रॉफवर फायरिंग? पोलीस तपासात काय काय आढळलं? हादरवणारी माहिती समोर
Salman Khan Bigg Boss 20 Weekend Ka Vaar: सलमान खाननं टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर उचललं महत्त्वाचं पाऊल? 'बिग बॉस 20'बाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाला...
सलमान खाननं टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर उचललं महत्त्वाचं पाऊल? 'बिग बॉस 20'बाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाला...

व्हिडीओ

Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election Result 2026: जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
RSS Vijayadashami 2026: 'वंदे मातरम्'सह मंचावर 'खास' संदेश, पारंपरिक शस्त्रांसह भारतीय बनावटीचं अस्मि अत्याधुनिक कार्बाइन; स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचं यंदाचं वैशिष्ट्य काय?
'वंदे मातरम्'सह मंचावर 'खास' संदेश, पारंपरिक शस्त्रांसह भारतीय बनावटीचं अस्मि अत्याधुनिक कार्बाइन; स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचं यंदाचं वैशिष्ट्य काय?
Farmers Death Maharashtra: कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
Vishwas Nangre Patil and Chandrashekhar Bawankule: रेशीमबागेत संघाच्या विजयादशमी उत्सवाला कडेकोट बंदोबस्त, आयुक्त विश्वास नांगरे ऑन फिल्ड, पांढरा शर्ट-खाकी पँटमधील बावनकुळे समोर येताच भेटले, नेमकं काय घडलं?
संघाच्या विजयादशमी उत्सवाला कडेकोट बंदोबस्त, विश्वास नांगरे ऑन फिल्ड, पांढरा शर्ट-खाकी पँटमधील बावनकुळे समोर येताच भेटले, नेमकं काय घडलं?
Satej Patil : गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
Salman Khan Bigg Boss 20 Weekend Ka Vaar: सलमान खाननं टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर उचललं महत्त्वाचं पाऊल? 'बिग बॉस 20'बाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाला...
सलमान खाननं टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर उचललं महत्त्वाचं पाऊल? 'बिग बॉस 20'बाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाला...
Nashik: अर्धनग्न पूजा ते दैवी अन् अघोरी शक्तीने पैशांचा पाऊस पाडण्याचा बहाणा, नाशिकच्या भोंदूने पनवेलच्या पीडितेसोबत नको-नको ते केलं; अंनिसच्या प्रयत्नांनंतर अखेर गुन्हा दाखल
अर्धनग्न पूजा ते दैवी अन् अघोरी शक्तीने पैशांचा पाऊस पाडण्याचा बहाणा, नाशिकच्या भोंदूने पनवेलच्या पीडितेसोबत नको-नको ते केलं; अंनिसच्या प्रयत्नांनंतर अखेर गुन्हा दाखल
Elon Musk : इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार, मस्क यांच्या घोषणेचं नेमकं कारण काय?
इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार 
Embed widget