Kangana Ranaut On Marriage:  बॉलिवूडची पंगा क्विन अशी ओळख असणारी अभिनेत्री  कंगना रनौत (Kangana Ranaut) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. कंगना ही सध्या 'टिकू वेड्स शेरू' (Tiku Weds Sheru) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. कंगनानं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सध्या कंगना ही चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. एका मुलाखतीमध्ये कंगनानं तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितलं आहे. 


काय म्हणाली कंगना? 



कंगनाला एका मुलाखतीमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत विचारण्यात आलं. यावेळी कंगना म्हणाली, "प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि ती वेळ माझ्या आयुष्यात येणार असेल तर ती येईल. माझे लग्न व्हावे, माझे स्वतःचे कुटुंब असावे, अशी माझी इच्छा आहे, पण ते योग्य वेळी होईल." कंगनाच्या या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


कंगनाचं नाव अनेकांसोबत जोडलं गेलं होतं. काही वर्षांपूर्वी कंगना ही अभिनेता हृतिका रोशनला डेट करत होती, असंही म्हटलं जातं. आता कंगना ही कोणासोबत लग्न करेल? याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.


बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा 'टिकू वेड्स शेरू' या अभिनेत्री कंगना रनौतच्या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेत्री अवनीत कौर (Avneet Kaur) देखील या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे.  






कंगनाचे आगामी चित्रपट 


कंगना (Kangana Ranaut) ही चंद्रमुखी 2,  इमर्जन्सी आणि तेजस  या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  कंगनाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. आता कंगनाचा 'टिकू वेड्स शेरू' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.  या चित्रपटाचे दिग्दर्शन हे साई कबीर श्रीवास्तव यांनी केले आहे.  हा चित्रपट 23 जून रोजी अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.  'टिकू वेड्स शेरू'  हा चित्रपट अशा एका व्यक्तीच्या जीवनावर आधारित आहे, जो मुंबईमध्ये अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी स्ट्रगल करत असतो. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Kangana Ranaut And Salman Khan Video: कंगनानं शेअर केला जुना व्हिडीओ; सलमानला विचारला प्रश्न, म्हणाली, 'आपण इतके तरुण...'