Kangana Ranaut And Salman Khan Video: अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि अभिनेता सलमान खान (Salman Khan) हे दोघेही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. पंगा क्विन कंगना ही अनेक वेळा सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करते. तिच्या या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. नुकताच कंगनानं इन्स्टाग्रामवर एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सलमान आणि ती एका शोमध्ये चर्चा करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करुन कंगनानं सलमानला एक प्रश्न विचारला आहे.
काही वर्षांपूर्वी कंगनानं दस का दम या सलमानच्या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा जुना व्हिडीओ कंगनानं इन्स्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, कंगना ही डोक्यावर ओढणी घेते. त्यानंतर सलमान तिचं कौतुक करतो. कंगना ही धक-धक करने लगा गाण्यावर डान्स करत आहे.
कंगनानं सलमानला विचारला प्रश्न
कंगनानं हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'OMG, एस.के आपण इतके तरुण कसे दिसत आहोत? म्हणजे त्याचा अर्थ असा होतो का की, आता आपण तरुण नाहीये?' कंगनानं हा व्हिडीओ शेअर करुन सलमान खानला देखील टॅग केलं आहे.
कंगनाचे आगामी चित्रपट
कंगना ही लवकरच इमर्जन्सी या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच ती चंद्रमुखी-2 या चित्रपटात देखील काम करणार आहे, असंही म्हटलं जात आहे.
सलमान खानचा काही दिवसांपूर्वी किसी का भाई किसी की जान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. आता तो लवकरच टायगर-3 या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सलमान च्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :