बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा आपल्या ट्विटमुळे चर्चेत आली आहे. 30 जानेवारी रोजी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त कंगनाने नथुराम गोडसे बद्दल एक ट्विट केले होते, जे काही मिनिटांतच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले. या ट्विटमध्ये कंगना रनौतने गोडसेच्या व्यक्तिरेखा चांगल्या प्रकारे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. या ट्विटनंतर ट्विटर युजर्स दोन गटात विभागलेले पाहायला मिळाले. कंगना आणि तिच्या भूमिकेवर अनेकांनी टीका केली तर बरेच लोक तिच्या विचारांचे समर्थन करताना दिसत होते.


कंगना रनौतचे ट्विटः
या ट्विटमध्ये कंगना रनौत यांनी नथुराम गोडसेचे छायाचित्रे शेअर केली आहेत. हे फोटो शेअर करताना कंगनाने लिहलंय की, "प्रत्येक कथेचे तीन पैलू असतात, एक आपला आहे, एक माझा आणि एक सत्य आहे.. चांगला कथाकार हा कोणाला बांधील नसतो किंवा तो काही लपवतही नाही.. त्यामुळे आपली पुस्तके निरुपयोगी आहेत... पूर्णपणे दिखावा करणारी"




या ट्विटमध्ये कंगनाने #NathuramGodse चा देखील वापर केला आहे. 30 जानेवारी रोजी नथुराम गोडसेने देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची गोळ्या घालून हत्या केली होती. अशा परिस्थितीत लोक कंगनाच्या देशभक्तीवरही प्रश्न उपस्थित करत आहेत.


कंगनाचे आगामी चित्रपट
कंगना रनौत सध्या राजकारणावर आधारित आणखी एका मोठ्या चित्रपटाचा भाग झाली आहे. खरं तर एकीकडे कंगनाचा 'थलाईवी' हा चित्रपट रिलीज होईल, तर दुसरीकडे कंगना देखील देशातील पहिल्या आणि एकमेव महिला पंतप्रधान इंदिरा गांधीची भूमिका साकारताना दिसणार आहे.


कंगना 'थलाईवी' चित्रपटामध्ये तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट 'थलाईवी' सारखा बायोपिक असणार नाही आणि कंगना रनौत व्यतिरिक्त इतर अनेक आघाडीचे कलाकार या चित्रपटात काम करताना दिसतील. कंगनाने अलीकडे जे. जयललिताच्या जीवनावर आधारित 'थलाईवी' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केलं आहे. याशिवाय तिने 'वॉरियर क्वीन ऑफ कश्मीर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिद्दावर कंगनाने 'मणिकर्णिका रिटर्न्स: द लीजेंड ऑफ दिद्दा' आणि 'अपराजिता अयोध्या' हे चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती.