Kangana Ranaut Tejas Box Office Collection Day 1 : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) 'तेजस' (Tejas) हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजआधीपासून चर्चेत असलेल्या या सिनेमात पंगाक्वीन वैमानिकेच्या भूमिकेत दिसत आहे. बॉक्स ऑफिसवर 'तेजस'ने निराशाजनक सुरुवात केली आहे. 


'तेजस' हा सिनेमा रिलीजआधीपासून चर्चेत होता. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या सिनेमाची चांगलीच उत्सुकता होती. कंगनादेखील या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत होती. एवढं सगळं असूही बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात 'तेजस' हा सिनेमा कमी पडला आहे.


'तेजस'चं ओपनिंग डे कलेक्शन जाणून घ्या... (Tejas Opning Day Collection)


'तेजस' हा सिनेमा 27 ऑक्टोबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. भारतात हा सिनेमा 1300 स्क्रीन्सवर रिलीज झाला होता. अॅडव्हान्स बुकिंगदेखील या सिनेमाचं खूप कमी झालं होतं. कंगना रनौतच्या बहुचर्चित 'तेजस' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी फक्त 1.25 कोटींची कमाई केली आहे. आता वीकेंडला या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होऊ शकते. 


तगडी स्टारकास्ट असलेला 'तेजस'


'तेजस' या सिनेमात अंशुल चौहान, वरुण मित्रा, आशीष विद्यार्थी आणि विशाख नायर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तगडी स्टारकास्ट असूनही हा सिनेमा प्रेक्षकांना कुठेतरी कंटाळवाणा वाटतो. जगभरात या सिनेमाचे अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 2600 तिकीट विकले गेले होते. सर्वेश मारवाहने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. सिनेमात कंगना रनौत फायटर प्लेन उडवताना दिसत आहे.




कंगनाचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप


कंगना रनौतचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होत आहेत. कंगनाचा याआधी 'धाकड' आणि 'चंद्रमुखी 2' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. आता 'तेजस' या सिनेमाच्या माध्यमातून कंगनाने पुन्हा कमबॅक केलं. पण हे कमबॅक मात्र अयशस्वी ठरलं आहे.


कंगनाचे आगामी प्रोजेक्ट (Kangana Ranaut Upcoming Project)


कंगनाचा 'चंद्रमुखी 2' (Chandramukhi 2) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता तिचा 'इमरजेंसी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. तेजस हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहेत. या सिनेमात अभिनेत्री वैमानिकाच्या भूमिकेत दिसत आहे. 27 ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 


संबंधित बातम्या


Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17'मध्ये कंगना रनौतची एन्ट्री! भाईजानने घेतली 'या' स्पर्धकांची शाळा; पहिला 'वीकेंड का वार' ठरला खास