Malaika Arora Marathi Look Video : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियावर नेहमीच ती व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. आता तिने मराळमोळ्या लूकमधील एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 


मलायका अरोराचा मराठमोळा लूक (Malaika Arora Marathi Look)


अभिनेत्री मलायका अरोराने मराठमोळ्या लूकमधील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात तिने भरजरी साडी, लाल रंगाच्या बांगड्या, हार, नाकात नथ, केसात गजरा, बांगड्या, झुमके आणि कपाळी चंद्रकोर, पैंजण असा काहीसा मराठमोळा लूक केलेला पाहायला मिळत आहे. तयार होतानाचा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं आहे,"पारंपरिक ते अधिक सुंदर". 






मलायकाच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांचा कमेंट्सचा वर्षाव


मलायका अरोराचा मराठमोळ्या लूकमधील व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अभिनेत्रीच्या लूकचं चाहते कौतुक करत आहेत. तिच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. बोनी कपूर यांची लाडकी सून, 50 वर्षांची अजिबात वाटत नाही, किती सुंदर दिसतेस, मराठमोळ्या लूकमध्ये मलायका खूपच सुंदर दिसते आहे, कायम अशाच राहा, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 


मलायकाचा याआधी 'झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार 2023' या पुरस्कार सोहळ्यातील 'ऐका दाजीबा' या गाण्यावर थिरकतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तसेच डान्सनंतर अभिनेत्रीने लाडूदेखील वळले. मलायकाचा हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. मलायकाचा 'ऐका दाजीबा'वरील डान्स प्रेक्षकांना 4 नोव्हेंबरला पाहायला मिळणार आहे.


मलायका अरोराबद्दल जाणून घ्या... (Who is Malaika Arora)


मलायका अरोरा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. फिटनेस फ्रिक अभिनेत्रींमध्ये मलायकाची गणना होते. 'छैय्या छैय्या', मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए या गाण्यांमुळे मलायकाला विशेष लोकप्रियता मिळाली. मलायकाने 1998 मध्ये अरबाजसोबत लग्न केले. त्यानंतर 2017 मध्ये मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला. सध्या मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे.  अर्जुन आणि मलायका यांच्यामधील वयाच्या अंतरामुळे अनेक वेळा नेटकरी त्यांना ट्रोल करतात. पण हे कपल ट्रोलर्सकडे लक्ष न देता एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.


संबंधित बातम्या


Malaika Arora: नटून थटून पुरस्कार सोहळ्याला पोहोचली मलायका; श्रेया बुगडेला पाहिल्यानंतर म्हणाली...