कंगना रनौत सातत्याने सोशल मीडियावर काही ना काही बोलत असते. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर खरंतर तिच्या या बोलण्याला धार आली होती. ती सातत्याने महाराष्ट्रावर टीका करत होती. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही तिने सोडलं नाही. पण आता कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती तिच्या फोटोमुळे. हा फोटो टाकून अवघे दहा तासही उलटले नाहीत. पण कंगनाने दिलेल्या उत्तरामुळे मात्र सोशल मीडियावर एकच गहजब उडाला आहे.


कंगनाने साधारण दहा तासांपूर्वी ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला. तिचा मेक्सिकोतल्या एका बेटावरचा हा जुना फोटो होता. या फोटोत कंगना पाठमोरी दिसते. तिने केस सोडले आहेत आणि ती या बीचवर बसली आहे. हा फोटो पाहता ती बिकीनीमध्ये या बीचवर बसली आहे हे सहज ओळखता येतं. हा फोटो टाकून दहा तास उलटले नाहीत तर कंगनावर या फोटोमुळे ट्रोलकरी तुटून पडेल आहेत. कंगनाला ट्रोलकऱ्याची ही टीका सहन झालेली नाही. म्हणून आता अखेर कंगना बोलली. आपल्या फोटोवर आलेल्या ट्रोलकऱ्यांच्या कमेंट्सना तिने आणखी एक पोस्ट करून उत्तर दिलं आहे. या पोस्टमुळे मात्र आणखी चर्चेला उधाण आलं आहे.


कंगनाने दोन तासांपूर्वी केलेल्या पोस्टमध्ये आपल्या बिकिनी फोटोचा उल्लेख केला आहे. त्यावर तिने कट्टर हिंदूत्ववाद्यांना आणि सनातन विचारसरणीच्या लोकांना धारेवर धरलं आहे. यावर बोलताना ती म्हणते, काही लोक माझा बिकिनीतला फोटो बघून मला धर्म आणि सनातनचं लेक्चर देऊ लागले आहेत. समजा कधी देवी भेरवी आपले केस मोकळे सोडून विवस्त्र.. दुष्टांचं मर्दन करणाऱ्या रुपात समोर आली असती तर मग अशावेळी तुमचं काय होईल? तुमची तर भीतीने गाळण उडेल आणि तुम्ही स्वत:ला भक्त समजत आहात. धर्माचं पालन करा. त्याचे ठेकेदार होऊ नका... जय श्रीराम.




कंगनाच्या या पोस्टने तर आणखी गहजब उडाला. या तिच्या पोस्टमुळे या फोटोतली पाठमोरी बिकिनी घातलेली कंगना आपली तुलना देवी भेरवीशी करतेय की काय अशी शंका अनेकांनी व्यक्त केली आहे. तर काहींना हा मोठा विनोद वाटला आहे. कलाकार म्हणून तुला वाटेल ते तू करणार आणि तो फोटो सोशल मीडियावर टाकणार आणि आम्ही काही बोललो की लगेच स्वत:ची तुलना तू देवीशी करणार का.. असा सवाल अनेकांनी तिच्यासमोर उपस्थित केला आहे. तर काहींनी तिचं ट्विट रिट्विट करताना शिवसेनेने केलं ते योग्यच होतं असं म्हणत तिच्यावर कुणीतरी गुन्हा दाखल करा अशीही अपेक्षा व्यक्त केली आहे. अनेकांनी तिची टरही उडवली आहे. काहींनी हिमाचली व्हर्जन ऑफ मां भेरवी असंही म्हटलं आहे.


कंगना वारंवार अनेक गोष्टींवर कमेंट करून आपलं लक्ष वेधून घेत असते. पण आता तिची ही तलवार तिच्यावरच उलटली आहे. व्यक्त होताना भान न ठेवल्यामुळेच कंगना आता पेचात सापडली आहे असं काहींना वाटतं. कंगनाच्या या ट्विटवर उत्तर देताना हे तर कधीतरी होणार होतंच, असंही म्हटलं आहे.


संबंधित बातमी :
कंगनाच्या ट्विटर अकाऊंटवर कायमची बंदी आणण्यासाठी हायकोर्टात याचिका 


Kangana Ranaut | शेतकरी आंदोलन राजकीय हेतून प्रेरित : कंगना रनौत