Gadar 2 OMG 2 Ghoomer Jailer Box Office Collection : 'गदर 2' (Gadar 2), 'ओएमजी 2' (OMG  2), 'घूमर' (Ghoomer) आणि 'जेलर' (Jailer) हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहेत. एकीकडे हे सिनेमे बॉक्स ऑफिस गाजवत असताना दुसरीकडे 'ड्रीम गर्ल 2' (Dream Girl 2) आणि 'अकेली' (Akelli) हे सिनेमे प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. 


'गदर 2'ने पार केला 500 कोटींचा टप्पा (Gadar 2 Box Office Collection)


'गदर 2' हा सिनेमा प्रदर्शित होऊन 12 दिवस पूर्ण झाले आहेत. रिलीजआधीपासून चर्चेत असलेल्या या सिनेमाला भारतीय सिने-रसिकांनी डोक्यावर घेतलं आहे. मोठ्या वीकेंडचा या सिनेमाला चांगलाच फायदा झाला आहे. रिलीजच्या पहिल्या आठवड्यात या सिनेमाने 284.63 कोटींची कमाई केली आहे. तर रिलीजच्या 12 दिवसांत या सिनेमाने 400.10 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर जगभरात या सिनेमाने 506.6 कोटींचं कलेक्शन जमवलं आहे. सनी देओल (Sunny Deol), अमीषा पटेल (Ameesha Patel) आणि उत्कर्ष शर्मा (Utkarsh Sharma) या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.


बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांचा 'ओएमजी 2' (OMG 2) हा सिनेमाही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्या आठवड्यात या सिनेमाने 85.05 कोटींची कमाई केली आहे. तर 12 दिवसांत या सिनेमाने 120.62 कोटींचा गल्ला जमवला आहे. या सिनेमाचं कथानक आणि कलाकारांच्या अभिनयाचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. तर जगभरात या सिनेमाने (OMG 2 Box Office Collection) 163.55 कोटींचा गल्ला जमवला आहे.


रजनीकांतचा जगभरात बोलबाला...


दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांची क्रेझ चाहत्यांमध्ये आजही कायम आहे. त्यांचा 'जेलर' हा सिनेमा जगभरातील बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे. रिलीजच्या पहिल्या आठवड्यात या सिनेमाने 235.85 कोटींची कमाई केली आहे. भारतात रिलीजच्या 13 दिवसांत या सिनेमाने 291.80 कोटींची कमाई केली आहे. तर 'जेलर' (Jailer Box Office Collection) या सिनेमाने जगभरात 516.9 कोटींचा गल्ला जमवला आहे.


'गदर 2' आणि 'OMG 2'मध्ये अभिषेकच्या 'घूमर'ची घुसमट


'घूमर' हा सिनेमा 18 ऑगस्ट 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पाच दिवसांत या सिनेमाने (Ghoomer Box Office Collection) भारतात 4.16 कोटींची कमाई केली आहे. एकीकडे 'गदर 2' आणि 'ओएमजी 2' हे दोन सिनेमे बॉक्स ऑफिसवर धमाका करत असताना या सिनेमांच्या शर्यतीत आता 'घूमर' सिनेमाचा समावेश झाला आहे. पण रिलीजच्या पाच दिवसांत हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडला आहे. अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि सैयामी खेर (Saiyami Kher) या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.


संबंधित बातम्या


Box Office Collection : 'गदर 2' अन् 'जेलर'चा जलवा कायम; 'OMG 2' आणि 'घूमर' थंडावला; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...