Mukesh Khanna On Shaktimaan Movie : 90 च्या दशकातील सर्वांचा आवडता सुपरहिरो अर्थात 'शक्तिमान'वर (Shaktimaan) आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'शक्तिमान'या मालिकेच्या माध्यमातून मुकेश खन्ना (Mukesh Khanna) घराघरांत पोहोचले. आता हा 'शक्तिमान' रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 


मुकेश खन्ना यांनी गेल्या वर्षी सोनी पिक्चर्सच्या बॅनरअंतर्गत 'शक्तिमान' सिनेमाची घोषणा केली होती. सोनी पिक्टर्सने एक व्हिडीओ शेअर करत यासंदर्भात घोषणा केली होती. देसी सुपरहोरीची सिनेप्रेमींमध्ये चांगलीच क्रेझ आहे. आता या सिनेमाची घोषणा झाल्यापासून 'शक्तिमान'चे चाहते सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 


200-300 कोटींच्या बजेटमध्ये शक्तिमानची निर्मिती : मुकेश खन्ना


मुकेश खन्ना यांनी नुकत्याच एका मुलाखतीत 'शक्तिमान'बद्दल भाष्य केलं आहे. ते म्हणाले की,"शक्तिमान' या बिग बजेट सिनेमावर सध्या काम सुरू आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा सिनेमा असेल. 200-300 कोटींच्या बजेटमध्ये या बहुचर्चित सिनेमाची निर्मिती होत आहे". 


मुकेश खन्ना पुढे म्हणाले,"स्पायडर मॅनची निर्मिती करणारे सोनी पिक्चर्स 'शक्तिमान'ची निर्मिती करत आहेत. कोरोना महामारीमुळे या सिनेमाचं शूटिंग पुढे ढकलण्यात आलं होतं. या सिनेमाची स्टारकास्ट काय असेल, सिनेमा कोण दिग्दर्शित करणार हे लवकरच समोर येईल". आता शक्तिमान हे आयकॉनिक पात्र रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 


रणवीर सिंह झळकणार 'शक्तिमान'च्या भूमिकेत?


'शक्तिमान' सिनेमात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) सुपरहिरोच्या भूमिकेत दिसून शकतो, असे म्हटले जात आहे. 'शक्तिमान' ही मालिका 13 सप्टेंबर 1997 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. 1997 ते 2005 पर्यंत या मालिकेने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं. या मालिकेत मुकेश खन्ना गंगाधर आणि शक्तिमान या भूमिकांमध्ये झळकले होते. 






मुकेश खन्नाच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता


मुकेश खन्ना (Mukesh Khanna) सध्या मनोरंजनसृष्टीपासून दूर आहेत. 'शक्तिमान' या मालिकेसह मुकेश खन्ना वारिश, विश्वामित्र, महायोधा आणि चंद्रकांता सारख्या मालिकांमध्ये दिसले होते. आता त्यांच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे. 'शक्तिमान' या सिनेमाचा ते भाग असणार आहेत, असे म्हटले जात आहे. 



संबंधित बातम्या


Mukesh Khanna : "मी एफआयआरला घाबरत नाही", अडचणीत वाढ झाल्यानंतर मुकेश खन्नाचं वक्तव्य