Kangana Ranaut on Animal : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) अभिनीत 'अ‍ॅनिमल' (Animal) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला आहे. एकीकडे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत असताना दुसरीकडे मात्र या सिनेमावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्यानंतर कंगना रनौतनेही (Kangana Ranaut) या सिनेमावर निशाणा साधला आहे.


'अ‍ॅनिमल' हा सिनेमा महिला विरोधी असल्याचं म्हटलं जात आहे. लोकप्रिय गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी 'अ‍ॅनिमल' या सिनेमाच्या यशाला खतरनाक असं म्हटलं आहे. अशातच आता कंगना रनौतनेही याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. महिलांची मारहाण पाहायला सिनेप्रेक्षकांना आवडते, असं तिने म्हटलं आहे.


कंगनाच्या एका चाहत्याने ट्वीट केलं आहे की,"झी 5 वरील कंगना रनौतचा 'तेजस' (Tejas) हा उत्कृष्ट सिनेमा आहे. पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कुठे कमी पडला हे मला ठाऊक नाही. करण जोहरसारखी (Karan Johar) मंडळी तिचं करिअर संपवायचा प्रयत्न करत आहेत. सर्वांनी हा सिनेमा नक्की पाहायला हवा". 


'पंगाक्वीन' कंगना रनौतने या ट्वीटवर प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की,"माझ्या सिनेमांसाठीची पेड नकारात्मकता जबरदस्त आहे. मी आजवर खूप संघर्ष केला आहे. पण प्रेक्षकांना महिलांची मारहाण करणारे सिनेमे पाहायला जास्त आवडतं. या सिनेमांत एका महिलेला बूट चाटायला लावली जातात. S...X ऑब्जेक्ट प्रेक्षकांना आवडतं. स्त्री सक्षमीकरणाच्या सिनेमांसाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या व्यक्तींसाठी हे खूप निराशाजनक आहे. येत्या काळात करिअर बदलू शकतं. आयुष्यात चांगलं काम करण्यावर माझा भर असेल". 






जावेद अख्तर काय म्हणाले? 


जावेद अख्तर यांनी 'अ‍ॅनिमल' या सिनेमावर टीका करत म्हटलं होतं,"आज सिनेमा बनवणाऱ्या मंडळींपेक्षा ते पाहणाऱ्या प्रेक्षकांवर जास्त जबाबदारी आहे. महिलेला बूट चाटायला लावणारे सिनेमे प्रेक्षकांना आवडत असतील तर ही गंभीर बाब आहे.


'अ‍ॅनिमल' या सिनेमात कंगना रनौतसह बॉबी देओल, अनिल कपूर, तृप्ति डिमरी आणि शक्ति कपूर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या सिनेमाने अनेकांना सुपरस्टार बनवलं आहे. या सिनेमाने तृप्ती डिमरीला तर नॅशनल क्रश बनवलं आहे. एकीकडे या सिनेमातील कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक होत असताना दुसरीकडे मात्र सिनेमाला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे.


संबंधित बातम्या


Animal Success Party : जावेद अख्तर 'अ‍ॅनिमल'च्या यशाला म्हणाले 'खतरनाक'; सिनेमाच्या सक्सेस पार्टीत बॉलिवूडकरांची मांदियाळी