Kangana Ranaut On Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding : बॉलिवूडची 'पंगाक्वीन' कंगना रनौत (Kangana Ranaut) नेहमीच कोणत्या ना कोणत्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. कधी इंडस्ट्रीतल्या मंडळींची शाळा घेते तर कधी निशाणा साधते. आता तिने अप्रत्यक्षरित्या बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्यावर निशाणा साधला आहे.
कंगना रणौतची पोस्ट काय? (Kangana Ranaut Post)
कंगनाने इंस्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. पण या पोस्टच्या माध्यमातून 'पंगाक्वीन' आलिया आणि रणबीरवर भाष्य करत असल्याचं स्पष्ट दिसतंय. पोस्ट शेअर करत कंगनाने लिहिलं आहे,"पती-पत्नीची जोडी वेगवेगळ्या फ्लोरवर राहत आहेत आणि उत्कृष्ट जोडपं असल्याचं नाटक करत आहेत. अभिनेता आगामी सिनेमांची खोटी घोषणा करत आहेत. तर अभिनेत्री मित्राचा ब्रँड स्वत:चा असल्याचे सांगत आहे."
कंगनाने पुढे लिहिलं आहे,"कोटुंबिक कार्यक्रमापासून सुनेला आणि नातीला वंचित ठेवलेलं सर्वांनी पाहिलं आहे". रिपोर्टनुसार, नीतू कपूरच्या वाढदिवसासाठी रणबीर कपूरसह सर्व कपूर कुटुंबीय खास लंडनला गेले होते. पण या कार्यक्रमाला आलिया आणि तिची लेक मात्र गेले नव्हते.
कंगना म्हणाली,"फक्त पैसे आणि प्रमोशनसाठी लग्न केलं आहे. वडिलांच्या दबावामुळे त्यांनी लग्न केलं आहे. या लग्नामुळे अभिनेत्याला एक सिनेमा मिळाला आहे. पण आता दोघेही या फेक लग्नापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आता अभिनेत्याने पत्नी आणि लेकीकडे लक्ष देण्याची गरज आहे. हा भारत आहे. एकदा लग्न झालं की परिस्थिती बदलता येत नाही".
कंगनाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. कंगनाच्या या पोस्टवर आलिया-रणबीरने भाष्य केलेलं नाही. आता हे जोडपं काय प्रतिक्रिया देणार याकडे नेटकऱ्यांचं आणि चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
कंगनाच्या आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घ्या... (Kangana Ranaut Upcoming Project)
'पंगाक्वीन' कंगना रनौतचा (Kangana Ranaut) 'इमरजेंसी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेत असण्यासोबत ती या सिनेमाचं दिग्दर्शनदेखील करणार आहे. तसेच राघव लॉरेंसच्या 'चंद्रमुखी 2' (Chandramukhi 2) या सिनेमातदेखील ती दिसणार आहे. तसेच 'द अवतार:सीता' हा तिचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या