Bhumi Pednekar Unknown Facts: अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. भूमीचा आज वाढदिवस आहे. भूमीचे चाहते आणि सेलिब्रिटी भूमीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.  आज भूमीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल


भूमीचा जन्म 18 जुलै 1989 रोजी झाला. भूमी जेव्हा 18 वर्षांची होती तेव्हा तिचे वडील सतीश पेडणेकर (Satish Pednekar) यांचे निधन झाले. सतीश पेडणेकर हे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री देखील होते. सतीश पेडणेकर यांचे तोंडाच्या कर्करोगाने निधन झाले.


भूमीच्या पालकांनी एज्युकेशन लोन घेऊन भूमीचे अॅडमिशन एका चांगल्या अॅक्टिंग स्कूलमध्ये केले. पण भूमीला त्या अभिनयाच्या शाळेतून काढून टाकण्यात आले होते. कारण भूमीचे अटेंडन्स खूपच कमी होती, त्यामुळे तिला शाळेतून काढून टाकण्यात आले. यानंतर तिने यशराज फिल्म्समध्ये असिस्टंट डायरेक्टर काम केले आणि तिचे एज्युकेशन लोन फेडले.


पहिल्या चित्रपटासाठी वाढवलं वजन


भूमी पेडणेकरने तिच्या 'दम लगा के हईशा' (Dum Laga Ke Haisha) या पहिल्या चित्रपटासाठी सुमारे 12 किलो वजन वाढवले ​​होते. या चित्रपटानंतर तिनं स्वत:ला फिट ठेवण्यासाठी खूप मेहनत घेतली. वर्कआउटसह डाएट फॉलो करून सुमारे 33 किलो वजन कमी केले. 'दम लगा के हईशा' या चित्रपटात भूमीसोबतच अभिनेता आयुष्यमान खुराणानं देखील प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.






वैयक्तिक आयुष्यामुळे असते चर्चेत


भूमी ही चित्रपटांबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी भूमीचं नाव यश कटारियासोबत जोडलं जात होतं. तसेच भूमीला तिच्या लूकमध्ये अनेकादा ट्रोल केलं जातं. 






भूमीचे चित्रपट


2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या दम लगा के हैशा या चित्रपटामधून भूमीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. टॉयलेट: एक प्रेम कथा,बधाई दो, पती पत्नी और वो आणि गोविंदा नाम मेरा या चित्रपटांमध्ये भूमीनं काम केलं आहे. भूमीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Bhumi Pednekar: 'ओठांची सर्जरी केली का?'; नेटकऱ्यांनी भूमी पेडणेकरला केलं ट्रोल