हैदराबाद : अभिनेत्री कंगना रणावत 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झासी' या तिच्या आगामी सिनेमाची शूटिंग करताना जखमी झाली आहे. तलवारबाजीचा सीन शूट केला जात होता, त्याचवेळी तलवार कंगनाच्या डोक्याला लागली आणि ती जखमी झाली.

हैदराबादमध्ये या सिनेमाची शूटिंग सुरु आहे. या घटनेनंतर कंगनाला तातडीने अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्या डोक्याला 15 टाके पडले असून आणखी काही दिवस तिला रुग्णालयातच ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे.



सीनची तयारी अनेकदा केली होती. मात्र शूटिंग करताना थोडा गोंधळ झाला. निहार पंड्या कंगनावर तलवारीने वार करतो तेव्हा कंगनाला डोकं खाली झुकवायचं असतं. मात्र वेळ चुकली आणि कंगनाच्या दोन्ही भुवयांच्या मध्ये तलवार लागली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, अशी माहिती सिनेमाचे निर्माते कमल जैन यांनी दिली.