मुंबई : तो लढला, त्याच्या माणसांसाठी, त्याच्या मातीसाठी आणि त्याचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी.. सुभेदार तानाजी मालुसरे. तानाजी मालुसरेंचं शौर्य लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. अभिनेता अजय देवगण तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.


अजय देवगणने 'तानाजी : द अनसंग वॉरियर' या सिनेमाचं पहिलं पोस्टर शेअर केलं आहे. या सिनेमात अजय देवगणच तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत दिसेल. 2019 मध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे.

https://twitter.com/ajaydevgn/status/887745143704395776

'लोकमान्य एक युगपुरुष' या सिनेमाचे दिग्दर्शक ओम राऊत या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.

तानाजी मालुसरे यांचं "आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं' हे इतिहासात अजरामर झालेलं वाक्य सर्वांच्याच परिचयाचं आहे. भारताच्या दैदीप्यमान इतिहासात तानाजी मालुसरे यांचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं आहे. त्‍यांच्‍या जाण्‍याने छत्रपती शिवरायही हळहळले होते आणि ‘गड आला पण माझा सिंह गेला' असे भावनिक उद्गार काढले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याचा शूर मावळा तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आता मोठ्या पदड्यावर पाहायला मिळणार आहे.