मुंबई : डान्सर आणि विनोदी अभिनेता जावेद जाफ्रीचा मुलगा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या नव्या चित्रपटात मिझान जाफ्री झळकणार आहे.
संजय भन्साळी त्यांची भाची शर्मिन सेहगलसोबत मिझानला बॉलिवूडमध्ये लाँच करणार आहेत. अनेक दिवसांपासून भन्साळींच्या नव्या प्रोजेक्टबद्दल चर्चा सुरु होत्या. अखेर खुद्द जावेद जाफ्रीनेच यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
मिझानने 'बाजीराव मस्तानी' चित्रपटासाठी भन्साळींचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. मिझान मार्शल आर्ट्समध्ये तरबेज असून रंगभूमीवरही त्याने काम केलं आहे. विशेष म्हणजे वडील जावेद जाफ्रींप्रमाणेच त्यालाही नृत्याची आवड आहे.
मिझानने न्यूयॉर्कमध्ये चार वर्ष फिल्म मेकिंग आणि व्हिज्युअल आर्ट्सचं शिक्षण घेतलं आहे. भन्साळींच्या एका चित्रपटासाठी मिझानने ऑडिशन दिली होती. ती पाहून भन्साळी प्रभावित झाले होते.
भन्साळींच्या भाचीसोबत जावेद जाफ्रीचा मुलगा बॉलिवूडमध्ये
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Jul 2017 05:22 PM (IST)
डान्सर आणि विनोदी अभिनेता जावेद जाफ्रीचा मुलगा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या नव्या चित्रपटात मिझान जाफ्री झळकणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -