जयपूर : 'मणिकर्णिका द क्वीन ऑफ झाँसी'च्या सेटवर अभिनेत्री कंगना रणावतला गंभीर इजा झाली आहे. सिनेमाची शुटिंग सुरु असताना कंगना घसरुन पडली, ज्यामुळे तिच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.


राजस्थानमधील जोधपूरच्या एका खाजगी रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले. शुटिंग सोडून कंगना मुंबईला परतणार असल्याचीही माहिती आहे. राजस्थानमधील मेहरानगड किल्ल्यावर सिनेमाची शुटिंग सुरु आहे.

दरम्यान या सिनेमाची शुटिंग करताना कंगना या अगोदरही जखमी झाली होती, ज्यामध्ये तिच्या डोक्याला पंधरा टाके पडले होते. तलवारबाजीचा सीन शुट करताना ती जखमी झाली होती. हैदराबादमध्ये शुटिंग सुरु असताना ही घटना घडली होती.

या सिनेमाचं दिग्दर्शन राधा कृष्ण जगरलमुदी करत आहे. तर सिनेमाची कथा के. व्ही. विजेंद्र प्रसाद यांनी लिहिली आहे, ज्यांनी ‘बाहुबली’चा स्क्रीनप्ले लिहिला होता. यावर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यापासून या सिनेमाची शुटिंग सुरु आहे.

संबंधित बातमी : तलवारबाजीचा सीन शूट करताना कंगना जखमी, डोक्याला 15 टाके