अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आम्हाला विश्वास आहे. मात्र इतिहासाशी छेडछाड करणं कदापि सहन केलं जाणार नाही, असं विजय रुपनी म्हणाले. उत्तर प्रदेशमध्येही या सिनेमाच्या प्रदर्शनाची वाट खडतर असणार आहे. शिवाय मध्य प्रदेशात हा सिनेमा रिलीज होणार नाही, असं मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अगोदरच स्पष्ट केलं आहे.
‘पद्मावती’ला असलेल्या विरोधाने आता राजकीय स्वरुप घेतलं आहे. राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनीही पद्मावती सिनेमाला विरोध असल्याचं बोलून दाखवलं आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली.
सिनेमातील आक्षेपार्ह दृष्य हटवल्याशिवाय राज्यात सिनेमा प्रदर्शित होऊ देऊ नये, अशी मागणी जयकुमार रावल यांनी केली. शिवाय सेन्सॉर बोर्डात इतिहासकारांचा समावेश असावा, असं पत्रही त्यांनी सेन्सॉर बोर्डाला पाठवलं आहे.
पद्मावती सिनेमाला अगोदर राजपूत करणी सेनेचा विरोध होता. मात्र आता या विरोधाला राजकीय स्वरुप प्राप्त झालं आहे. मध्य प्रदेशात सिनेमा रिलीज केला जाणार नाही, असं मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर आता राज्यातही सिनेमाविरोधी सूर दिसत आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही सिनेमा रिलीज होऊ देऊ नये, अशी मागणी केली होती. सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात सापडलेल्या या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र तरीही संजय लीला भन्साळी यांच्यासमोरील अडचणी कमी होताना दिसत नाहीत.
संबंधित बातम्या :
संबंधित बातम्या :