Kangana Ranaut : बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौत (Kangana Ranaut) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कंगनाने आता तिच्या आगामी 'इमरजेंसी' (Emergency) सिनेमा संदर्भात एक किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे. कंगनाचा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
कंगनाने तिच्या इस्टाग्राम स्टोरीवर 25 जून 1975 सालातील एका वर्तमानपत्रात आलेली बातमी शेअर केली आहे. या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शनाची धुरा कंगना सांभाळणार आहे. सिनेमात कंगना इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगनाने याआधीदेखील माजी मुख्यमंत्री दिवंगत जे. जयललितांच्या भूमिकेत दिसून आली आहे.
कंगनाचा 'टिकू वेड्स शेरू' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर मुख्य भूमिकेत आहेत. कंगनाचा धाकड सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी जादू दाखवू शकला नाही. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यातदेखील कमी पडला.
'भूल भुलैया 2'मुळे 'धाकड' पडला मागे
'धाकड' सिनेमा कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 2' या सिनेमामुळे बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला आहे. कंगनाच्या 'धाकड' सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. पण दुसरीकडे प्रेक्षकांना 'भूल भुलैया 2' ची क्रेझ होती. त्यामुळे प्रेक्षकांनी 'भूल भुलैया 2'ला पसंती दर्शवली. 'धर्मवीर' आणि 'सरसेनापती हंबीरराव' या मराठी सिनेमांनीदेखील धाकडपेक्षा अधिक कमाई केली आहे. कंगनाच्या 'इमरजेंसी' सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमासाठी उत्सुक आहेत. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या