Kangana Ranaut On Farm Laws : हिमाचलमधील मंडी लोकसभा मतदारसंघाच्या भाजप खासदार बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने रद्द केलेले तीन कृषी कायदे पुन्हा लागू करण्याची मागणी केली आहे. या कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी शेतकऱ्यांनीच करावी, असंही कंगनानं म्हटलं आहे.कंगनाच्या या वक्तव्यावर पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. कंगनाच्या या वक्तव्यानंतर विरोधी पक्षांनी भाजप आणि मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 


कंगना रणौत पुन्हा बरळली


कृषी कायद्याविरोधात (Farm Law) शेतकऱ्यांनी देशव्यापी आंदोलन केलं होतं. 14 महिन्यांच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर नोव्हेंबर 2021 मध्ये केंद्र सरकारला कृषी कायदे मागे घ्यावे लागले होते. आता खासदार कंगना रणौतने (Kangana Ranaut) तेच कायदे पुन्हा लागू करण्याची मागणी केल्याने नवा वाद उफाळून आला आहे. अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतच्या कृषी कायदे परत आणण्याच्या वक्तव्यापासून भाजपने हात वर केले आहेत. भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी कंगना राणौतच्या वक्तव्य ही तिची वैयक्तिक भूमिका असल्याचं म्हटलं आहे. 


कृषी कायद्यांबद्दल नेमकं काय म्हणाली कंगना रणौत?






रद्द केलेले कृषी कायदे पुन्हा लागू करण्याची कंगनाची मागणी


भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी म्हटलंय, मला स्पष्ट करायचं आहे की, हे विधान कंगनाचं वैयक्तिक विधान आहे. कंगना रणौतला भाजपच्या वतीने असं विधान करण्याचा अधिकार नाही आणि तिचे वक्तव्य कृषी विधेयकांवर भाजपचं मत दर्शवत नाही. या विधानाचा आम्ही निषेध करतो, असं म्हणत भाजपने कंगनाच्या भूमिकेपासून हात झाडले आहेत.






कंगना राणौतच्या वक्तव्यावरून यू-टर्न


भाजपने कंगनाच्या वक्तव्याचा निषेध केल्यानंतर  कंगना रणौतनेही ट्विटरवर ट्वीट करत हे तिचं वैयक्तिक मत असल्याचं म्हटलं आहे. कंगनाने X मीडिया पोस्टमध्ये लिहिलंय की, 'कृषी कायद्यांबाबत माझी मते वैयक्तिक आहेत आणि त्यांचा पक्षाशी काहीही संबंध नाही. धन्यवाद.'


काँग्रेसचा मोदी सरकारवर निशाणा


काँग्रेसने कंगना रणौतच्या वक्तव्याचा विरोध करत मोदी सरकारवर निशाणा साधत काँग्रेस शेतकऱ्यांसोबत असल्याचं म्हटलं आहे. कृषी कायद्यांवरील खासदार कंगना रणौतच्या वक्तव्याचा हवाला देत काँग्रेसने आरोप केला आहे. सत्ताधारी भाजप 2021 मध्ये रद्द केलेले तीन कायदे परत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि हरियाणा त्याला योग्य उत्तर देईल, असं काँग्रेसने म्हटलंय.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Bigg Boss Marathi 5 Winner : ठरलं! अभिजीत सावंत बिग बॉस मराठीचा विजेता? सोशल मीडियावर चर्चेला उधाण