Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठी पाचव्या सीझनला धमाकेदार सुरुवात झाली, तेव्हापासून हा शो प्रचंड चर्चेत आहे. यंदाचा सीझन पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. आता बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 100 दिवसांसाठी सुरु झालेला हा शो आता 70 दिवसांनी आटोपण्यात येणार आहे. बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन संपायला अवघे दोन आठवडे शिल्लक राहिले आहेत. आपल्या आवडत्या स्पर्धकाला जिंकवण्यासाठी चाहते खूप प्रयत्न करताना दिसत आहे. यंदाच्या सीझनचा ग्रँड फिनाने पार पडण्याआधीच विजेत्याचं नाव चर्चेत आहे.
अभिजीत सावंत बिग बॉस मराठीचा विजेता
बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi Winner) यंदाच्या सीझनचा विजेता लवकरच मिळणार आहे. बिग बॉसप्रेमी याची आतुरतेने वाट पाहत आहेत. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले (Bigg Boss Marathi Grand Finale) 6 ऑक्टोबरला पडणार आहे. त्याआधीच विजेत्याचं नाव चर्चेत आहे. अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) बिग बॉस मराठीच्या यंदाच्या पाचव्या सीझनचा विजेता असल्याचं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या स्पर्धकांची एक यादी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये स्पर्धकांची नाव आणि विजेता तसेच उपविजेला असा उल्लेख दिसत आहे. पाहता क्षणी ही विकीपीडियावर यादी असल्यासारखं भासत आहे. त्यामुळे ग्रँड फिनाले आधीच विजेत्याचं नाव समोर आल्याचं बोललं जात आहे.
सोशल मीडियावर चर्चेला उधाण
सोशल मीडियावर व्हायरल यादीनुसार, अभिजीत सावंत पाचव्या सीझनचा विजेता ठरणार असल्याचं बोललं जात आहे. तर अंकिता चव्हाण पहिली उपविजेता तर सूरज चव्हाण दुसरा उपविजेता ठरल्याचं यादीवरुन दिसत आहे. त्याशिवाय, जान्हवी तिसरी उपविजेती तर निक्की चौथी उपविजेती ठरल्याचं व्हायरल यादीमध्ये दिसत आहे. या अफवांनी सोशल मीडियावर जोर धरला आहे.
बिग बॉस म्हणजे मनोरंजनाचा बॉस
बिग बॉस मराठीच्या यंदाचा सीझन पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे, मग ते स्पर्धकांमुळे असो किंवा मग, होस्ट रितेश देशमुख याच्यामुळे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या होस्टिंगची जबाबदारी अभिनेता रितेश देशमुख याच्या खांद्यावर देण्यात आली. त्यानंतर शोकडे मोठा प्रेक्षकवर्ग वळला आहे. यामुळेच यंदाचा सीझनने बिग बॉस मराठी आधीच्या सीझनच्या तुलनेत टीआरपीमध्ये बाजी मारली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :