शिमला : बॉलिवूडमधील कोरोनाबाधितांच्या यादीत आता अभिनेत्री कंगनाच्या नावाची भर पडली आहे. आपल्याला कोरोनाची लागण झाली असून हिमाचल प्रदेशमध्ये क्वारन्टाईन असल्याची माहिती तिने आपल्या इन्स्टाग्रामवरुन दिली आहे. या काळात आपण कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत असल्याचंही तिने सांगितलं आहे.
आपला ध्यानधारणा करतानाचा एक फोटो शेअर करत कंगनाने सांगितलं आहे की, गेल्या काही दिवसांपासून तिला डोळ्यांची जळजळ आणि अशक्तपणा जाणवत होता. आपण हिमाचल प्रदेशमधून बाहेर पडणार होतो त्यावेळी कोरोना चाचणी केली आणि आपला अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं तिने सांगितलं.
कंगनाने आपल्या सोशल मीडियातील पोस्टमध्ये लिहिलंय की, "मी स्वत:ला क्वारन्टाईन करुन घेतलंय. मला माहित नव्हतं की हा व्हायरस माझ्या शरीरात पार्टी करत आहेत. आता मी त्याला संपवणार आहे. आपण कोणीही अशा गोष्टींना थारा देऊ नका. जर आपण या गोष्टीला घाबरलो तर ते आपल्याला जास्त घाबरवतील. कोरोना हा फक्त एक फ्लू आहे, ज्याने काही लोकाच्या मनामध्ये भीती निर्माण केली आहे. आपण त्याला संपवून टाकू. हर हर महादेव"
आपल्या वादग्रस्त ट्वीट्समुळे सातत्याने चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने कंगनाने आपल्या ट्वीट्सच्या माध्यमातून वादग्रस्त वक्तव्ये केली होती. त्यावर आता ट्विटरने कारवाई करत तिचे अकाऊंट सस्पेंड केलं आहे. त्यावर तिने ट्विटरवर वंश भेदाचा आरोप करत ट्विटरकडून भारतीयांना भेदभावाची वागणूक देत असल्याचं सांगितलं होतं.
महत्वाच्या बातम्या :
- Covid-19 Cases in India: देशात कोरोनाचा कहर, 24 तासात 4 हजारांपेक्षा जास्त मृत्यू, चार लाखांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद
- Pandharpur Bypoll | पंढरपुरात इलेक्शन ड्युटीला गेलेल्या शिक्षकासह कुटुंबातील चौघांचा कोरोनामुळे मृत्यू
- Skylab Crash : जमिनी विकल्या, पैसा खर्च केला...जेव्हा अमेरिकन 'स्कायलॅब'मुळे अंताच्या भीतीने भारतीयांची त्रेधातिरपीट उडाली होती