नवी दिल्ली : देशात दिवसागणिक कोरोनाबाधितांचीच संख्या केवळ वाढत नाही तर आता मृतांच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. भारतात पहिल्यांदाच एका दिवशी चार हजारांपेक्षा जास्त मृत्यूंची नोंद झाली आहे. तर सलग तिसऱ्या दिवशी चार लाखांपेक्षा जास्त नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. 


आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासात  4 लाख 01 हजार 078 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 4 हजार 187 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय 3 लाख 18 हजार 609 जण कोरोनामुक्त झाले आहेत.


7 मे पर्यंत देशभरात 16 कोटी 73 लाख 46 हजार 544 जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. तर काल 22 लाख 97 हजार 257 जणांना लस दिली. आतापर्यंत एकूण 30 कोटी 4 लाखांपेक्षा जास्त जणांची कोरोना चाचणी केली असून काल 18 लाख नमुने घेण्यात आले, ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 22 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.


देशात कोरोनाची आजची स्थिती
मागील 24 तासातील नव्या रुग्णांची संख्या - 4 लाख 01 हजार 078
मागील 24 तासातील कोरोनामुक्तांची संख्या - 3 लाख 18 हजार 609
मागील 24 तासातील मृतांची संख्या - 4 हजार 187
एकूण कोरोनाबाधितांची संख्या - 2 कोटी 18 लाख 92 हजार 676
एकूण कोरोनामुक्तांची संख्या - 1 कोटी 79 लाख 30 हजार 960
एकूण सक्रिय रुग्णांची संख्या - 37 लाख 23 हजार 446
एकूण मृतांची संख्या - 2 लाख 38 हजार 270


महाराष्ट्रात सर्वाधित रुग्ण
महाराष्ट्रात शुक्रवारी 54 हजार 022 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या वाढून 49 लाख 96 हजार 758 झाली आहे. तर 898 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 74 हजार 413 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात गुरुवारी 62 हजार 194 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. तर 37 हजार 386 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याने आतापर्यंत एकूण 42 लाख 65 हजार 326 जण कोरोनामुक्त झाले आहे. मागील 24 तासात  2 लाख 68 हजार 912 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. तर मुंबईतील कालची कोरोनाबाधितांची संख्या 3040 एवढी होती आणि 71 रुग्णांचा मृत्यू झाला होता. पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे.


देशातील मृत्यूदर 1.09 टक्के असून रिकव्हरी रेट 82 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. याशिवाय अॅक्टिव्ह रेट वाढून 17 टक्के झाला. कोरोना सक्रिय रुग्णांच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या स्थानावर आहे. एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येच्या बाबतीतही भारताचं स्थान दुसरं आहे. याशिवाय जगभरात अमेरिका, ब्राझील, मेक्सिकोनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.