Kangana Ranaut Chandramukhi 2 First Look Out : बॉलिवूडची 'पंगाक्वीन' अर्थात कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या तिच्या आगामी 'चंद्रमुखी 2' (Chandramukhi 2) या सिनेमामुळे चर्चेत आहे. आता या सिनेमातील अभिनेत्रीचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'चंद्रमुखी 2' सिनेमातील कंगनाचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


कंगना रनौतने 'चंद्रमुखी 2' (Kangana Ranaut Shared Chandramukhi 2 Look) सिनेमातील आपला लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. या लूकमध्ये 'पंगाक्वीन'चा शाही अंदाज पाहायला मिळत आहे. कंगनाने लूक शेअर करत लिहिलं आहे,"सौंदर्यवती... आणि तिच्या अदा... लक्ष वेधून घेणारी 'चंद्रमुखी'. शाही थाटात सादर करत आहोत 'चंद्रमुखी 2' सिनेमातील कंगना रनौतचा लूक.. तामिळ, हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नडभाषेत सिनेमा प्रदर्शित होईल". 






कंगना रनौतआधी 'चंद्रमुखी 2' या सिनेमातील राघव लॉरेन्सचा लूक समोर आला होता. 'चंद्रमुखी 2' या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री पहिल्यांदाच राघवसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. कंगनाच्या शाही अंदाजाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांची सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. 


'चंद्रमुखी 2' हा सिनेमा 2005 मध्ये आलेल्या पी. वासु दिग्दर्शित सिनेमाचा सीक्वेल आहे. या सिनेमात रजनीकांत आणि ज्योतिका मुख्य भूमिकेत झळकले होते. आता प्रेक्षकांना 'चंद्रमुखी 2' या सिनेमाचा सीक्वेल आहे. तामिळ, हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 


'चंद्रमुखी 2' कधी होणार रिलीज? (Chandramukhi 2 Released Date)


'चंद्रमुखी 2' या थरार नाट्य असलेल्या विनोदी सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. पी. वासु यांनी या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. कंगना रनौतसह या सिनेमात वडिलेलू, सृष्टी डांगे आणि लक्ष्मी मेनन देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा 19 सप्टेंबर 2023 रोजी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कंगनाचा आगामी 'इमर्जन्सी' (Emergency) हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या दोन्ही सिनेमांची चाहते आता प्रतीक्षा करत आहेत.


संबंधित बातम्या


Chandramukhi: कंगनाच्या 'चंद्रमुखी-2' ची रिलीज डेट जाहीर; 'या' दिवशी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस