Kangana Ranaut Chandramukhi 2: अभिनेत्री   कंगना रनौत (Kangana Ranaut) ही सध्या तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिचा 'टिकू वेड्स शेरू' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कंगनानं निर्मिती केली होती.आता लवकरच तिचा 'चंद्रमुखी 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कंगनाने नुकतेच चंद्रमुखी 2 या चित्रपटचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करुन या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे.


कंगना रनौतने  सोशल मीडियावर चंद्रमुखी 2 या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. चंद्रमुखी 2 हा चित्रपट सप्टेंबरमध्ये गणेश चतुर्थीच्या विशेष मुहूर्तावर प्रदर्शित होणार असल्याची माहिती कंगनानं सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. चित्रपटाचं शेअर करुन कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले, 'ती या सप्टेंबरमध्ये परत येत आहे... तुम्ही तयार आहात का?'


पी. वासू दिग्दर्शित चंद्रमुखी 2 या चित्रपटात राघव लॉरेन्स हे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच कंगना देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच वाडीवेलू आणि इतर कलाकार या चित्रपटात दिसतील. लायका प्रॉडक्शन आणि सुबास्करन निर्मित हा चित्रपट  तमिळ, तेलगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. कंगनाचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 






 चंद्रमुखी 2 हा तमिळ सुपरस्टार रजनीकांत यांच्या 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या  चंद्रमुखी या ब्लॉकबस्टर हॉरर-कॉमेडी चित्रपटाचा सिक्वेल असेल, असं म्हटलं जात आहे. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर कंगनाने  चंद्रमुखी 2 या चित्रपटाबाबत एक भावनिक पोस्ट केली होती.


कंगनाचे आगामी चित्रपट 


कंगना (Kangana Ranaut) ही चंद्रमुखी 2 या चित्रपटाबरोबरच इमर्जन्सी आणि तेजस  या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  कंगनाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.   कंगनाचा 'टिकू वेड्स शेरू' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला.  या चित्रपटाचे दिग्दर्शन हे साई कबीर श्रीवास्तव यांनी केले आहे.  'टिकू वेड्स शेरू'  हा चित्रपट अशा एका व्यक्तीच्या जीवनावर आधारित आहे, जो मुंबईमध्ये अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी स्ट्रगल करत असतो. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Kangana Ranaut: पंगा क्विन कंगना थाटणार संसार? म्हणाली, 'लग्न करण्याची इच्छा आहे, पण...'