Kamal Haasan Love Life : दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन (Kamal Haasan) आज आपला 69 वा वाढदिवस साजरा करत आहेत. कमल हासन यांनी फक्त दाक्षिणात्य सिनेमांत काम न करता हिंदी आणि बंगाली सिनेमांतदेखील काम केलं आहे. कमल हासन दोनवेळा लग्नबंधनात अडकले असून आजही ते सिंगल आयुष्य जगत आहेत.


कमल हासन यांनी वयाच्या सहाव्या वर्षी बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली आहे. आजवरच्या अनेक सुपरहिट सिनेमांचा ते भाग आहेत. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कमल हासन त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासह व्यावसायिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतात.


कमल हासन यांची लव्ह लाईफ (Kamal Haasan Love Life Affais and Marriage)


कमल हासन पहिल्यांदा 70 च्या दशकात अभिनेत्री श्रीविद्याच्या प्रेमात पडले. श्रीविद्या यांनी तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये काम केलं आहे. दोघांच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या. या जोडप्याने अनेक सिनेमांत एकत्र काम केलं आहे. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. कुटुंबियांचा पाठिंबा असूनही कमल हासन आणि श्रीविद्या विभक्त झाले.


श्रीविद्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर कमल हासन 1978 मध्ये नृत्यांगना वाणी गणपतीसोबत लग्नबंधनात अडकले. त्यावेळी त्यांचं वय फक्त 24 वर्षे होतं. कमल हासन आणि श्रीविद्या यांचंही नातं फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या 10 वर्षांनंतर 1988 मध्ये ते वेगळे झाले. पुढे कमल हासनच्या आयुष्यात सारिकाची एन्ट्री झाली. अभिनेत्री सारिकाच्या प्रेमात कमल हासन वेडे झाले होते. सारिकासोबत ते लिव्ह इनमध्ये राहायला लागले. 


16 वर्षांच्या सुखी संसारानंतर विभक्त झालेले कमल हासन...


कमल हासन सारिकाच्या प्रेमात पडले तेव्हा वाणीसोबतच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान सारिका गरोदर झाली आणि 1986 मध्ये श्रृती हासनचा जन्म झाला. श्रृतीच्या जन्माच्या दोन वर्षांनंतर कमल हासनने सारिकासोबत 1998 मध्ये लग्न केलं. लग्नानंतर त्यांना अक्षरा नावाची मुलगी झाली. अक्षराच्या जन्मानंतर कमल आणि सारिकाचं बिनसलं. पुढे 16 वर्षांच्या सुखी संसारानंतर 2004 मध्ये ते विभक्त झाले.


कमल हासन आणि गौतमीच्या अफेअरमुळे सारिकाने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कमल हासन आणि गौतमी 13 वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर कमल हासनचं नाव 22 वर्षीय सिमरन बग्गासोबत जोडलं गेलं. पाच अफेअर, दोन लग्न झालेले असूनही कमल हासन आज सिंगल आयुष्य जगतात.


संबंधित बातम्या


Kamal Haasan : कमल हासनने वाढदिवशी चाहत्यांना दिली खास भेट; 'Thug Life'चा टीझर आऊट! 36 वर्षांनी मणिरत्नमसोबत करणार काम