Rainbow Rishta Trailer Out: ओटीटीवर (Ott) विविध विषयावर आधारित असणाऱ्या वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. लवकरच अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ (Amazon Prime Video) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रेनबो रिश्ता (Rainbow Rishta) ही डॉक्यू सीरिज रिलीज झाली आहे. या सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला . या ट्रेलरमध्ये सहा विविध गोष्टींची झलक पहायला मिळते.


 'रेनबो रिश्ता' ही एक अनस्क्रिप्टेड  डॉक्यू सीरिज आहे जी सहा  प्रेमकथा आणि LGBTQIA+ समुदायाच्या सदस्यांचे अनुभव सुंदरपणे दाखवते. रेनबो रिश्ता' या डॉक्यू सीरिज  ट्रेलरमध्ये अनेक वेगवेगळ्या लोकांच्या कथा आहेत, जे  त्यांच्या आयुष्यातील अडचणी सांगत आहेत. काही जण जोडीदारासोबत  गुंतलेले असतात, तर काही प्रेमाच्या शोधात दिसतात.


'रेनबो रिश्ता' कधी होणार रिलीज?


'रेनबो रिश्ता'  ही डॉक्यू सीरिज ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2023 साठी प्राइम व्हिडिओच्या फेस्टिव्ह लाइनअपचा एक भाग आहे. या डॉक्यू सीरिजची निर्मिती व्हाइस स्टुडिओने केली आहे. तर जयदीप सरकार यांनी दिग्दर्शन केले आहे. हृदय ए नागपाल आणि शुभ्रा चॅटर्जी यांनी त्याच्यासोबत 'रेनबो रिश्ता' दिग्दर्शित केला आहे. ही मालिका आज (7 नोव्हेंबर)  Amazon Prime Video या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.






'रेनबो रिश्ता' मधील कलाकार


'रेनबो रिश्ता' या डॉक्यू सीरिजच्या ट्रेलरमध्ये त्रिनेत्रा हलधर, ऐश्वर्या आयुष्मान, डेनिएला मेंडोन्का, अनीज सॅकिया, सनम चौधरी, सोहम सेनगुप्ता, सुरेश रामदास आणि सदम हंजाबम हे कलाकार दिसत आहेत. LGBTQIA+ या समुदायामधील लोकांच्या आयुष्यात  घडणाऱ्या घटना या सीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहेत. 


'रेनबो रिश्ता'  डॉक्यू सीरिजबद्दल दिग्दर्शक जयदीप सरकार म्हणाले, "रेनबो रिश्ता ही  डॉक्यू सीरिज सर्वात मजबूत भावना आणि प्रेम दर्शवते. अभिमानाने एकत्र आयुष्य जगणाऱ्या या अद्भुत लोकांच्या खऱ्या  कहाण्या टिपता या सीरिजमध्ये दाखवण्याची संधी मला मिळाली. समलैंगिक लोकांचे जीवन कसे असते? ते तुमच्या आणि माझ्यासारख्या लोकांपेक्षा वेगळे नाहीयेत, असं या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे. "


संंबंधित बातम्या


Shah Rukh Khan : शाहरुख खानने 'डंकी' सिनेमासाठी घेतलंय तगडं मानधन; जाणून घ्या तापसी पन्नू, बोमन ईरानी यांच्या मानधनाबद्दल