Kamal Haasan Movie :  सुपरस्टार कमल हासन (Kamal Haasan) यांनी आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. कमल हासन यांनी आपल्या सिने कारकिर्दीत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. कमल हासन सध्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'कल्की 2898 एडी' या चित्रपटात त्यांनी खलनायकी भूमिका साकारली आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटात काम करणाऱ्या कमल हासन यांचा एक चित्रपट एक, दोन किंवा आठ महिने नाही तर तब्बल दोन वर्ष थिएटरमध्ये सुरू होता.  विशेष म्हणजे कमल हासन यांचा हा पहिला चित्रपट होता. सिनेसृष्टीत छाप सोडणाऱ्या चित्रपटाचे नाव 'एक दुजे के लिए' होते. वासू-सपनाच्या लव स्टोरीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. 


1981 साली ‘एक दुजे के लिए’ हा रोमँटिक ट्रॅजेडी ड्रामा चित्रपट रिलीज झाला होता.  बालचंदर यांनी दिग्दर्शन केले होते. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त दाक्षिणात्य भाषांमध्येही प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. 


693 दिवस थिएटरमध्ये झळकला चित्रपट...


'एक दुजे के लिए'मध्ये कमल हसनसोबत रती अग्निहोत्री आणि माधवी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. या दोन्ही अभिनेत्रींचा बॉलिवूडमधील हा पहिलाच चित्रपट होता. हा चित्रपट  प्रेक्षकांना इतका आवडला की ते अनेक दिवस सतत चालले. IMDB नुसार, हा चित्रपट बेंगळुरूच्या कल्पना थिएटरमध्ये 693 दिवस चालला. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते राज कपूर यांनाही हा चित्रपट आवडल्याचे बोलले जाते.


IMDB नुसार, हा चित्रपट पाहिल्यानंतर राज कपूर यांनी दिग्दर्शक बालचंदर यांना एक सूचना केली होती.  राज कपूर यांनी  चित्रपटाचा क्लायमॅक्स बदलण्याचा सल्ला दिला होता. चित्रपटाचा क्लायमॅक्सचा  हा हॅप्पी एन्डिंग असावा असे त्यांनी म्हटले होते. मात्र, राज कपूर यांची ही सूचना बालचंदर यांनी अमलात आणली नाही. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान यशस्वी ठरला. 






गाणी आजही लोकप्रिय... 


'एक दुजे के लिए' चित्रपटाची कथा लोकांना आवडली. पण या चित्रपटाची गाणीदेखील प्रेक्षकांना आवडली. चित्रपटाच्या 43 वर्षानंतरही गाणी लोकांच्या मनात आहेत. या चित्रपटाला लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीत दिले होते. 'सोलह बरस की...', 'तेरे मेरे बीच में....', 'मेरे जीवन साथी...' आदी गाणी लोकप्रिय आहेत.