Shah Rukh Khan Career Achievement Award :  बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) हा जगभरात प्रसिद्ध आहे. शाहरुख खान हा परदेशातही चांगलाच लोकप्रिय आहे. बॉलिवूडच्या या किंग खानची ग्लोबल स्टार अशी ओळख आहे. आता  शाहरुखच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. शाहरुख खानचा 'लोकार्नो फिल्म फेस्टिवल' (Locarno Film Festival)  मध्ये सन्मान करण्यात येणार आहे.



शाहरुख खानने आपल्या 32 वर्षांच्या  सिनेकारकिर्दीत अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. शाहरुखला भारतातच नव्हे तर जगभरातील इतर देशांनीदेखील अनेक विशेष पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. आता शाहरुख खानला 'लोकार्नो फिल्म फेस्टिव्हल'मध्ये करिअर अचिव्हमेंट अवॉर्ड देण्यात येणार आहे.


पहिला भारतीय अभिनेता... 


शाहरुख खानला 'लोकार्नो फिल्म फेस्टिवल'मध्ये पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना 'पार्डो अला करिअर असकोना-लोकार्नो टुरिझम' या नावाचा पुरस्कार मिळणार आहे. या चित्रपट महोत्सवाची सुरुवात 7 ऑगस्टपासून होणार आहे. 17 ऑगस्टपर्यंत हा महोत्सव सुरू असणार आहे. हा पुरस्कार मिळवणारा शाहरुख खान पहिला भारतीय अभिनेता असणार आहे. 






'लोकार्नो फिल्म फेस्टिव्हल'स्वित्झर्लंडमध्ये 7 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. 10 ऑगस्ट रोजी स्वित्झर्लंडमधील लोकार्नो येथील पियाझा ग्रांडे येथे शाहरुख खानचा सन्मान होणार आहे. शाहरुख खान 11 ऑगस्ट रोजी येथे सिनेप्रेक्षक, नागरिकांसोबत  संवाद साधणार आहे.


आयोजकांनी काय सांगितले?


 






शाहरुखला सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा मंगळवारी आयोजकांनी केली. लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलचे अर्टिस्टिक डायरेक्टर यांनी सांगितले की, जिओना ए नाझारो म्हणाले, 'भारतीय चित्रपटसृष्टीतील शाहरुख खानचे योगदान अतुलनीय आहे. खान  एक असा अभिनेता आहे ज्याने आपल्या चाहत्यांशी कधीही संपर्क गमावला नाही. जगभरातील त्याच्या चाहत्यांच्या त्याच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या तो पूर्ण करतो. तो खरोखरच लोकांचा नायक, हुशार, डाउन टू अर्थ आणि आपल्या काळातील एक लीजेंड असल्याचे  जिओना ए नाझारो यांनी सांगितले.