मुंबई : लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) हा अभिनेता सलमान खानचा (Bollywood Actor Salman Khan) सर्वात मोठा शत्रू. सलमान खानच्या जीवावर उठलेल्या या लॉरेन्स बिश्नोई गँगनं कोणता कट आखला होता, हे आता उजेडात आलं आहे. बिश्नोई गँगच्या टोळीतल्या पाच जणांविरोधात नवी मुंबई पोलिसांनी चार्जशीट दाखल केली आहे. ज्या पद्धतीनं सिद्धू मुसेवालाची मेड इन तुर्की गननं हत्या करण्यात आली होती, तसंच हत्यार खरेदी करून सलमानची हत्या करण्याचा कट होता, असा पोलिसांचा आरोप आहे.


भाईचे जानी दुश्मन, पाकिस्तान कनेक्शन! 


सलमान खानची हत्या कशी करता येईल याबाबत ऑगस्ट 2023 आणि एप्रिल 2024 मध्ये कट आखण्यात आला होता. सलमानच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी 60 ते 70 जणांच्या टोळीवर सोपवण्यात आली होती. सलमानचं पनवेलमधील फार्म हाऊस, गोरेगाव फिल्म सिटीमधल्या प्रत्येक हालचालींवर ही टोळी नजर ठेवून होती. 


शूटर्स संधीची वाट पाहत होते


कट तडीस नेण्यासाठी अल्पवयीन मुलाचा देखील शोध घेण्यात आला होता. आरोपी पाकिस्तानातून AK - 47, AK - 92, M-16 हत्यारं विकत घेणार होते. शूटर गोल्डी ब्रार आणि बिश्नोईच्या आदेशाची वाट पाहत होते. निवडण्यात आलेले शूटर्स पुणे, रायगड, नवी मुंबई, ठाणे आणि गुजरातमध्ये लपून बसले होते. 


सलमानवरचं संकट टळलेलं नाही


शूटर्सचा भारतातून पलायन करण्याचा प्लॅन देखील तयार होता. सुरुवातीला ते कन्याकुमारीला भेटणार होते. बोटीच्या माध्यमातून श्रीलंका गाठण्याची त्यांची योजना होती. मात्र, हा सगळा कट तडीस नेण्यापूर्वीच त्यांच्या हातात बेड्या पडल्या. आरोपी गजाआड झाले असले, तरी सलमानवरचं संकट टळलंय असं नाही. कारण कारागृहात राहून बिश्नोईनं अनेक हत्या घडवून आणल्या आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Salman Khan : कधी धमकीचे पत्र, तर कधी ईमेल अन् आता थेट दारात येऊन गोळीबार; सलमान खान गँगस्टरच्या रडारवर का आला?