Kamaal R Khan : वादग्रस्त वक्तव्य आणि ट्विट्समुळे चर्चेत असणाऱ्या कमाल आर खानला (Kamaal R Khan) वर्सोवा पोलिसांनी तीन वर्षापूर्वीच्या प्रकरणी अटक केली आहे. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कमाल आर खानला शनिवारी (3 सप्टेंबर) अटक करण्यात आली आणि रविवारी (4 सप्टेंबर) वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आले.
ANI कडून रविवारी एक ट्वीट शेअर करण्यात आलं. या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, 'जानेवारी 2019 च्या पहिल्या आठवड्यात शरीर सुखाची मागणी केल्याचा आणि तिचा हात जबरदस्तीने पकडल्याचा आरोप तक्रारदार महिलेनं कमाल आर खानवर केला आहे. या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी केआरकेला अटक केली आहे. वर्सोवा पोलिसांनी बोरिवली 24 एमएम न्यायालयाच्या बदलीच्या आदेशानुसार त्याला अटक केली आहे.'
'कमाल आर खानला आज (रविवारी) वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, अशी माहिती वर्सोवा पोलिसांनी दिली', असं ANI कडून शेअर करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये लिहिण्यात आलं आहे.
एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला ही अभिनेत्री, गायक आणि फिटनेस मॉडेल आहे. तिनं पोलिसांना सांगितले की, ती 2017 मध्ये एका पार्टीमध्ये ती कमाल आर खानला भेटली होती. तेव्हा कमाल आर खाननं स्वतःची ओळख निर्माता म्हणून करून दिली होती आणि तिला कथितपणे वचन दिले होते की, तो तिला इमरान हाश्मीच्या चित्रपटात मुख्य भूमिका देऊ करेल.'
2021 मध्ये कमाल आर खानच्या विरोधात त्या महिलेनं एफआयआर नोंदवला. भारतीय दंड संहिता कलम 354 A (लैंगिक छळ) आणि 509 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला होता.
सितम,मुन्ना पांडे बेरोजगार,देशद्रोही, एक व्हिलन यांसारख्या चित्रपटांमध्ये कमाल आर खाननं सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली. यामधील देशद्रोही या चित्रपटाची निर्मिती देखील कमालनं केली होती. 2009 मध्ये रिलीज झालेल्या बिग बॉस या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाच्या तिसऱ्या सिझनमध्ये कमाल आर खाननं सहभाग घेतला होता.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Kamaal R Khan : अभिनेता कमाल आर खानला मुंबईत अटक; 2020 मधील वादग्रस्त ट्विटप्रकरणी कारवाई