Kangana Ranaut On Mahesh Bhatt : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवर मतं मांडते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट या चर्चेत असतात. बॉलिवूडमधील काही व्यक्तींवर कंगना निशाणा साधत असते. आता नुकतीच चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांच्याबाबत कंगनानं एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं सांगितलं आहे की, महेश भट्ट यांचे खरे नाव अस्लम आहे.


कंगनाची पोस्ट
कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर महेश भट्ट यांचा एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये ते इस्लाम आणि मुस्लिमांबद्दल काहीतरी बोलताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत कंगनानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'त्यांनी त्यांचे खरे नाव वापरावे आणि कोणत्याही धर्माचे प्रतिनिधित्व करू नये, त्यांनी धर्मांतर केले आहे. त्यांचे खरे नाव अस्लम असल्याचे मला सांगण्यात आले आहे. दुसरे लग्न करण्यासाठी त्यांनी धर्म बदलला होता. अस्लम हे सुंदर नाव आहे. ते का लपवायचे? महेश जी लोकांना हिंसाचारासाठी भडकवत आहेत.' कंगनाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.  तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 



कंगनाचा आगामी चित्रपट


2023 मध्ये कंगनाचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये कंगना ही इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा लेखन आणि निर्मिती देखील कंगनानं केलं आहे. चित्रपटाचा स्क्रिनप्ले आणि संवाद लेखन हे रितेश शाह यांनी केलं आहे. या आधी देखील कंगनानं  बायोपिकमध्ये काम केलं आहे. ‘थालयवी’मध्ये कंगनाने तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांची भूमिका साकारली होती आणि ‘मणिकर्णिका’मध्ये तिने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका साकारली होती. आता कंगनाच्या इमर्जन्सी या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. कंगना ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या तिच्या धाकड या चित्रपटानं फारशी कमाई केली नाही पण आता इमर्जन्सी हा चित्रपट किती कमाई करेल? या प्रश्नाचं उत्तर कंगनाच्या चाहत्यांना लवकरच मिळेल. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :