Kamaal R Khan : वादग्रस्त वक्तव्य आणि ट्विट्समुळे चर्चेत असणाऱ्या कमाल आर खान (Kamaal R Khan) उर्फ केआरकेला अटक करण्यात आली आहे.  2020 साली त्यानं एक ट्वीट केलं होतं. या प्रकरणी मालाड पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दोन वर्षांनंतर केआरके हा मुंबईत पोहचला होता. त्यावेळी मुंबई विमानतळावरून पोलीसांनी त्याला अटक केली. त्याला आज बोरिवली कोर्टात हजर करण्यात येईल. 


काय आहे प्रकरण? 
केआरके हा सोशल मीडियावर नेहमी वादग्रस्त वक्तव्य करत होता. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केआरकेनं एका प्रसिद्ध व्यक्तीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानं ट्विटच्या माध्यमातून हे वक्तव्य केलं. त्यामुळे त्याच्याविरोधात मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. केआरके भारतात नव्हता. तो भारतात परत येण्याची वाट पोलीस बघत होते. दोन वर्षांनंतर कमाल आर खान मुंबई एअरपोर्टवर पोहचला, याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. त्यानंतर एक विशेष पथक मुंबई पोलिसांनी एअरपोर्टवर पाठवले. त्यानंतर पोलिसांनी कमाल आर खानला ताब्यात घेतलं. काल (सोमवार) सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर आज (मंगळवार) त्याला अटक करण्यात आली. आज कमाल आर खानला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.  


कोण आहे कमाल आर खान? 






सितम,मुन्ना पांडे बेरोजगार,देशद्रोही, एक व्हिलन यांसारख्या चित्रपटांमध्ये कमाल आर खाननं सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली. यामधील देशद्रोही या चित्रपटाची निर्मिती देखील कमालनं केली होती. 2009 मध्ये रिलीज झालेल्या बिग बॉस या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाच्या तिसऱ्या सिझनमध्ये कमाल आर खाननं सहभाग घेतला होता. हिंदी आणि  भोजपुरी चित्रपटांमध्ये त्यानं काम केलं. बॉलिवूडमधील कलाकारांबद्दल अक्षेपार्ह वक्तव्य कमाल करत असतो. त्याच्या ट्विट्सची आणि पोस्टची चर्चा सोशल मीडियावर होत असते. तसेच वेगवेगळ्या बॉलिवूड चित्रपटांचे रिव्ह्यू देखील तो सोशल मीडियावर शेअर करतो. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: