मुंबई : अभिनेता कमाल आर खान उर्फ केआरके त्याच्या खोचक आणि टीका करणाऱ्या ट्वीट्ससाठी सोशल मीडियावर चांगलाच प्रसिद्ध आहे. बॉलिवूडमधील अनेक अभिनेते, अभिनेत्री, क्रिकेटपटू, राजकारणी अशा सर्वांवर गरळ ओकणाऱ्या आणि अनेकांकडून शाब्दिक मार खाणाऱ्या केआरकेला नवं टारगेट मिळालं आहे.


 
केआरकेने सध्या आपला मोर्चा नवपरिणित दाम्पत्य बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्याकडे वळवला आहे. करण हा भारतातला सगळ्यात सेक्युलर तरुण आहे, कारण त्याने पहिलं लग्न शीख, दुसरं ख्रिश्चन तर तिसरं हिंदू तरुणीशी केलं, असं ट्वीट त्याने केलं आहे.

 

 

https://twitter.com/kamaalrkhan/status/727531874076266497

 
अर्थात करणला सेक्युलर म्हणताना केआरकेने उपहासात्मक टिपण्णी केली आहे, हे कोणाच्याही नजरेतून सुटलेलं नाही. करण सिंग ग्रोव्हरची पहिली पत्नी श्रद्धा निगम हिच्याशी घटस्फोट झाल्यानंतर तो अभिनेत्री जेनिफर विंगेटशी विवाहबद्ध झाला होता. त्यांचा काडीमोड झाल्यावर शनिवारी करण बंगाली ब्यूटी बिपाशा बसूसोबत लग्नबंधनात अडकला.

 

 

https://twitter.com/kamaalrkhan/status/727743144155058176

 
करण सिंग ग्रोव्हरपर्यंत न थांबता केआरकेने शशी थरुर यांनाही या प्रकरणात खेचलं आहे. मला करण आणि शशी जी आवडतात. कायम आनंदात राहण्यासाठी दोघांनाही अनेक वेळा लग्न करायला आवडतात. तुम्ही दोघं महान आत्मा आहात, असे तिरकस बाण कमाल खानने सोडले आहेत.

 
करण-बिपाशा लग्नानंतर व्यस्त असल्यामुळे दोघांकडून सध्या कोणताही रिप्लाय नाही. मात्र नवदाम्पत्य केआरकेच्या बाष्फळ ट्वीट्सना काय उत्तर देणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.