Chitrangada Singh Birthday : बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंह (Chitrangada Singh) आज (30 ऑगस्ट) तिचा 46वा वाढदिवस साजरा करत आहे. चित्रांगदा सिंहचा जन्म जोधपूर, राजस्थान येथे झाला. चित्रांगदा सिंहचे वडील आर्मी ऑफिसर होते. तर, तिचा भाऊ दिग्विजय सिंह प्रसिद्ध गोल्फपटू आहे. चित्रांगदाने दिल्लीच्या लेडी श्री राम कॉलेजमधून आपले पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. चित्रांगदाने कॉलेजच्या दिवसांपासून मॉडेलिंगला सुरुवात केली होती. कॉलेजमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे तिचे संपूर्ण आयुष्य पालटले होते.
अल्ताफ राजा यांच्या 'तुम तो ठहरे परदेसी' या अल्बममधून अभिनेत्री चित्रांगदाला मनोरंजन विश्वात लोकप्रियता मिळाली होती. तर, 'हजारों ख्वाहिशें ऐसी' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. प्रदीर्घ फिल्मी कारकीर्द असूनही चित्रांगदाला अभिनयात अपेक्षित प्रसिद्धी मिळवता आली नाही. त्यानंतर तिने चित्रपट निर्मितीत हात आजमावला. 'देसी बॉईज', 'इनकार' आणि 'ये साली जिंदगी' यांसारख्या अनेक चित्रपटांमधून तिने आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे.
कॉलेजमधील ‘या’ घटनेने बदलले आयुष्य!
चित्रांगदाच्या मनोरंजन विश्वात येण्यामागे देखील एक किस्सा आहे. ती याचं श्रेय कॉलेजमध्ये घडलेल्या एका घटनेला देते. या घटनेने तिचं आयुष्य बदलून टाकलं होतं. एका मुलाखतीत स्वतः चित्रांगदाने (Chitrangada Singh) हा किस्सा सांगितला होता. ती म्हणाली, ‘माझा मॉडेलिंगचा प्रवास कॉलेजमध्ये पहिल्याच वर्षी झालेल्या रॅगिंग सेशनने सुरू झाला. त्यावेळी मला उलटा ड्रेस परिधान करून, केसांना तेल लावून आणि पुस्तकांनी भरलेली बादली घेऊन रॅम्पवॉक प्रमाणे चालण्यास सांगितले गेले होते. हे माझे पहिले मॉडेलिंग ऑडिशन होते. साहजिकच मी यात खूप चांगली कामगिरी केली आणि नंतर कॉलेजच्या फॅशन टीमचा भाग झाले. इथूनच माझ्या मॉडेलिंग करिअरची सुरुवात झाली.’
लग्न अन् घटस्फोट
चित्रांगदाने (Chitrangada Singh) 2001 मध्ये भारतीय गोल्फपटू ज्योती रंधवासोबत लग्नगाठ बांधली होती. त्यांना जोरावर नावाचा एक मुलगाही आहे. पण, त्यांचे हे नाते फार काळ टिकले नाही आणि 2014मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दोघांच्या घटस्फोटानंतर अनेक चर्चा रंगल्या होत्या. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रांगदाच्या चित्रपटांमध्ये काम करण्याच्या निर्णयामुळे तिच्या वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण झाला आणि या मतभेदाचे रूपांतर घटस्फोटात झाले. चित्रांगदाला एक मुलगाही आहे, ज्याची कस्टडी अभिनेत्रीला मिळाली आहे. चित्रांगदा तिचा मुलगा जोरावरसोबत मुंबईत शिफ्ट झाली होती आणि चित्रांगदाने तिच्या मुलासोबत दिल्लीत राहावे, अशी ज्योती रंधवाची इच्छा होती. चित्रांगदाला तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे होते आणि दोघांनाही ते मान्य नव्हते. त्यामुळे त्यांच्यात खटके उडत होते, असेही बोलले गेले होते.
हेही वाचा :