Kalki 2898 AD Box Office Collection Day 16 : कल्कि 2898 एडी चित्रपटाचा बॉक्स ऑफिस फिवर कमी होताना दिसत नाहीय. सायंस फिक्शन कल्कि 2898 एडी चित्रपटाने 16 व्या दिवशीही भरघोस कमाई केली आहे. 27 जून रोजी प्रदर्शित झालेल्या कल्कि 2898 एडी चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील जादू कायम आहे. प्रभास, दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन, दिशा पटानी यांची स्टारकास्ट असलेल्या चित्रपटाची घोडदौड सुरुच आहे. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक विक्रम मोडीत काढले आहेत.


कल्की चित्रपटाची 16 दिवशी ताबडतोब कमाई


बॉक्स ऑफिसवर कल्की 2898 AD ला टक्कर देण्यासाठी, कमल हसनचा हिंदुस्तानी 2 आणि अक्षय कुमारचा सरफिरा चित्रपट नुकताच 12 जुलै रोजी रिलीज झाला आहे. याशिवाय इतर काही चित्रपटही चांगलं कलेक्शन करताना दिसत आहेत. पण असं असलं तरी याचा कल्की 2898 AD चित्रपटाच्या कमाईवर कोणताही परिणाम झालेला नाही. बॉक्स ऑफिसवरील 16 दिवसांच्या कलेक्शननंतर प्रभासच्या कल्की चित्रपटाने शाहरुख खानच्या 'पठाण' आणि सनी देओलच्या 'गदर 2' चित्रपटांना मागे टाकलं आहे. कल्किने पठाण आणि गदर 2 चित्रपटांच्या घरगुती कलेक्शनला मागे टाकलं आहे. कल्कि चित्रपट लवकरच जगभरात 1000 कोटींचा गल्ला जमवण्यापासून फक्त काही पाऊलं दूर आहे.


प्रभासच्या कल्कीचा जगभरात 900 कोटींचा गल्ला






पठाण आणि गदर 2 या चित्रपटांना टाकलं मागे


बॉक्स ऑफिस ट्रॅकर सकनील्कच्या माहितीनुसार, कल्की 2898 एडी चित्रपटाने 16 व्या दिवशी 5.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर या चित्रपटाचं भारतातील कलेक्शन 548.60 कोटी झालं आहे. कल्किने जगभरात आतापर्यंत 900 कोटींची कमाई केली असून जगभरातील कलेक्शनची 1000 कोटींच्या दिशेने वाटचाल होताना दिसत आहे. मात्र, पहिल्या आठवड्याच्या तुलनेत दुसऱ्या आठवड्यातील कल्की 2898 AD च्या कमाईमध्ये 69 टक्क्यांनी घट झाली आहे. पण देशांतर्गत कलेक्शनच्या बाबतीत या चित्रपटाने पठाण आणि गदर 2 या चित्रपटांना मागे टाकलं आहे.  पठाण चित्रपटाचं देशांतर्गत कलेक्शन 543.05 कोटी ,तर गदर 2 ची एकूण कमाई 525.45 कोटी रुपये आहे. तर कल्कीने 16 व्या दिवशीच हा आकडा पार केला आहे.






 


कल्कि 2898 एडीची कमाई सुरुच


साय-फाय चित्रपट 'कल्की 2892 एडी' 27 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या मल्टीस्टारर चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये कायम आहे. कल्की 2892 एडी चित्रपटाने जबरदस्त ओपनिंग केली होती आणि तेव्हापासून तो बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवत आहे. या चित्रपटाने भारतात 500 कोटींहून अधिक कमाई केली आहे. रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाच्या कलेक्शन आलेखात लक्षणीय घट झाली असली, तरी बॉक्स ऑफिसवर कल्कि जोरदार कमाई करत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Akshay Kumar : तीन वर्षात 7 फ्लॉप चित्रपट, निर्मात्यांना 800 कोटींचा फटका, 'सरफिरा' अक्षय कुमारला 'अच्छे दिन' दाखवणार?