मुंबई : बॉलिवूडच्या खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या सरफिरा चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'सरफिरा' (Sarfira) चित्रपट अक्षय कुमारसाठी फार महत्त्वाचा आहे. कारण, अनेक चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर या चित्रपटाकडून चांगली कमाई होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. अक्षय कुमार नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. हा असा अभिनेता आहे, ज्याचे वर्षभरात चार ते पाच चित्रपट प्रदर्शित होतात आणि त्यातील दोन-तीन चित्रपट 100 कोटींची कमाई करतात. त्यामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीच्या व्यवसायात अक्षय कुमारचा मोलाचा वाटा आहे, असं म्हटल्यासं वावगं ठरणार आहे.  


खिलाडी कुमार आऊट ऑफ फॉर्म


गेल्या काही वर्षात अक्षय कुमारची बॉक्स ऑफिसवरील जादू कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. अक्षय कुमारचे चित्रपट सध्या काही खास कमाई करताना दिसत नाहीयत. खिलाडी कुमार सध्या आऊट ऑफ फॉर्म दिसत आहे. सध्या सरफिरा चित्रपट थिएटरमध्ये दाखल झाला आहे. या चित्रपटाकडून अनेक अपेक्षा आहेत. सरफिरा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार विजेता तमिळ चित्रपट 'सोरारई पोटरु' या चित्रपटाचा ऑफिशिअल हिंदी रिमेक आहे. 


अक्षय कुमारचे सात चित्रपट फ्लॉप


कोविड 19 आणि 2020 मध्ये लॉकडाऊनपूर्वी अक्षयने 2019 मध्ये बॉक्स ऑफिस कमाईचा मोठा विक्रम केला होता. 2019 मध्ये त्यांचे 4 चित्रपट प्रदर्शित झाले होते, यामध्ये केसरी, मिशन मंगल, हाऊसफुल 4 आणि गुड न्यूज या चित्रपटांचा समावेश आहे. यापैकी जवळपास तीन चित्रपटांनी 200 कोटींचा आकडा गाठला, तर एका चित्रपटाने 150 कोटींहून अधिक कमाई केली.






2019 मध्ये बंपर कमाई


वर्षभर चित्रपटगृहे गाजवणाऱ्या अक्षयच्या चित्रपटांनी 750 कोटींहून अधिक कमाई केली आणि अक्षय 2019 मध्ये बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा स्टार बनला. मात्र लॉकडाऊननंतर त्यांच्या चित्रपटांची अवस्था बिकट झाली. लॉकडाऊननंतर त्याचा पहिला चित्रपट 'बेल बॉटम' फ्लॉप ठरला. रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये अक्षयची एंट्री करणारा 'सूर्यवंशी' 196 कोटींची कमाई करून सुपरहिट ठरला. पण चित्रपट अपेक्षित पातळी गाठू शकला नाही.


अक्षयच्या फ्लॉपमुळे इंडस्ट्रीचे मोठं नुकसान


लॉकडाऊननंतर अक्षय कुमारच्या चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. गेल्या वर्षी रिलीज झालेला 'OMG 2' सोडला तर, गेल्या 3 वर्षांत  अक्षयचे 7 चित्रपट फ्लॉप झाले आहेत, यामध्ये बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज, रक्षाबंधन, सेल्फी, मिशन राणीगंज, राम सेतू आणि बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटांचा समावेश आहे. 'OMG 2' चित्रपटामध्येही अक्षय कुमारची भूमिका फारच कमी कालावधीसाठी स्क्रीनवर दिसली, त्यामुळे तो स्पेशल अपिअरन्ससारखे होता. मिडिया रिपोर्टनुसार, अक्षयचे सात चित्रपट फ्लॉप ठरल्याने मेकर्सला सुमारे 800 कोटींचं नुकसान झालं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Housefull 5 : अक्षय कुमारसोबत आणखी एक सुपरस्टार लावणार कॉमेडीचा तडका, हाऊसफुल 5 मध्ये 'या' अभिनेत्याची एन्ट्री