Kalki 2898 AD Bhairava Anthem : अभिनेता प्रभासचा (Prabhas) या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट 'कल्की 2898 एडी' (Kalki 2898 AD) 27 जून रोजी रिलीज (Movie Release Date) होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. यातच आता या चित्रपटाच्या नव्या गाण्याने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. कल्की 2898 एडी चित्रपटाचे पहिलं गाणे भैरव अँथम रिलीज झालं आहे. कल्की 2898 एडी चित्रपटाच्या गाण्याच्या भैरव अँथम गाण्यामध्ये दिलजीत दोसांझने पंजाबी तडका जोडला आहे. या गाण्याचं भरभरून कौतुक होत आहे.


कल्कि 2898 एडी चित्रपटाचं पहिलं गाणं भैरवा अँथम प्रदर्शित!


गेल्या काही दिवसांपासून या गाण्याची चाहत्यांना प्रतीक्षा लागली होती. आज अखेर हे गाणे रिलीज करण्यात आलं आहे. या चित्रपटाचं संगीत संतोष नारायण यांनी दिलं आहे. भैरव अँथममध्ये तेलगू आणि पंजाबी भाषेचा तडका पाहायला मिळत आहे. पंजाबी गायक दिलजीत दोसांझ आणि प्रभास यांचा पंजाबी लूक या गाण्याचं सर्वात मोठे आकर्षण आहे. प्रभासचा पंजाबी लूक आणि दिलजीत दोसांजसोबतची प्रभासचा याराना चाहत्यांचं लक्ष वेधताना दिसत आहे. 


प्रभास आणि दिलजीत दोसांझचा याराना


हे गाणं प्रदर्शित होण्याआधी निर्मात्यांनी  गाण्याचा प्रोमो व्हिडीओ शेअर करून चाहत्यांची प्रतीक्षा शिगेला पोहोचली होती. त्यानंतर हे गाणं आज प्रदर्शित झालं आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी 16 जून रोजी गाण्याचा प्रोमो व्हिडीओ रिलीज केला होता. हे गाणे हिंदी व्यतिरिक्त तेलुगू आणि तामिळ भाषेतही रिलीज करण्यात आलं आहे. यामध्येही दिलजीतचा पंजाबी तडका पाहायला मिळत आहे. भैरव अँथम गाण्याचे बोल तामिळसाठी कुमार आणि विवेक, तेलुगूसाठी रामजोगय्या शास्त्री आणि विवेक आणि हिंदीसाठी कुमार यांनी लिहिले आहेत.


तेलुगू आणि पंजाबी भाषेचा स्वॅग


कल्कि 2898 एडी हा या वर्षीचा बिग बजेट चित्रपट असून चाहत्यांना याकडून खूप अपेक्षा आहे. कल्कि 2898 AD चित्रपटाचं बजेट 600 कोटी आहे. या चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची चाहत्यांना प्रतीक्षा लागली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यात अवघे 10 दिवस राहिले असल्याने चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. 27 जून रोजी हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.


पाहा व्हिडीओ :