Rinku Rajguru Marriage : 'सैराट' चित्रपटातून तरुणाईला याड लावणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) ही चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून रिंकू चाहत्यांना आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती देते. रिंकूच्या वडिलांनी त्यांच्या होणाऱ्या जावयाबाबतच्या अपेक्षा सांगितल्या आहेत. या अटी पू्र्ण करणाऱ्या मुलासोबत रिंकूचे लग्न लावून दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रिंकूचे वडील महादेव राजगुरू हे शिक्षक आहेत. नुकतीच त्यांनी 'फादर्स डे'च्या निमित्ताने राजश्री मराठी या युट्युब चॅनेलला भेट दिली. यावेळी त्यांनी रिंकूच्या होणाऱ्या नवऱ्याबाबत आणि आपल्या भावी जावयाच्या अपेक्षा सांगितल्या. रिंकू जो मुलगा आपला जोडीदार म्हणून ठरवेल तो चालेल. पण तिने सांगितल्यावर आम्ही त्यावर निर्णय घेऊ असे, रिंकूचे वडील महादेव राजगुरू यांनी सांगितले. मात्र, मला हा मुलगा आवडतो असे तिने सांगितल्यावर आम्ही लग्नासाठी तात्काळ होकार देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
जावई होण्यासाठी अटी काय?
महादेव राजगुरू यांनी मुलाखतीत पुढे म्हटले की, आम्ही रिंकूला ज्या प्रमाणे स्वातंत्र्य दिले आहे, त्याचप्रमाणे मुलानेदेखील तिला स्वातंत्र्य द्यावे. तू इकड जाऊ नकोस, तिकडे जाऊ नकोस अशी बंधने तिच्यावर नको असेही त्यांनी स्पष्ट केले. रिंकू काम करत असलेले क्षेत्र असे आहे की तिला प्रत्येक ठिकाणी जाव लागत आहे. या गोष्टी ज्या मुलाला समजतील तोच मुलगा तिला समजून घेऊ शकतो असेही त्यांनी सांगितले. रिंकूसाठी असा मुलगा असेल तर आम्हाला काहीच हरकत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
रिंकू ही मुळची सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील आहे. रिंकूचे वडील महादेव राजगुरू हे शिक्षक आहेत. रिंकू आज मराठी सिनेसृष्टीतील आघाडीतील अभिनेत्रीपैकी एक असली तरी आजही अकलूजमध्ये तिची ओळख ही राजगुरू सरांची मुलगी अशीच आहे.
रिंकूने 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या सैराट या चित्रपटात आर्चीची भूमिका साकारली होती. तिला या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कारात स्पेशल ज्युरी पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर तिने कागर, मान्सू मिलान्गय, झुंड, झिम्मा-2 आदी चित्रपटात काम केले. त्याशिवाय, 'हंड्रेड' या वेब सीरिजमध्ये तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली.